नाशिक

राज्यात रेती वाहतुकीला 24 तास परवानगी

राज्य शासनाचा नवा निर्णय जाहीर

नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाने रेती वाहतुकीसंदर्भात नवीन निर्णय जाहीर केला असून, रेती वाहतुकीस 24 तास परवानगी दिली आहे. महाराष्ट्र खनिज उत्खनन विकास व नियमन अधिनियम 2013 अंतर्गत व त्यास अनुसरून जारी केलेल्या अधिसूचना व धोरणानुसार, सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच रेतीचे उत्खनन बंधनकारक असले तरी, उत्खनन केल्यानंतर वाहतूक मात्र आता रात्रभर करता येणार आहे. शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करत अनेक अटी व शर्तींच्या अधीन राहून ही सवलत लागू केली आहे. दिवसा वाहतुकीच्या ताणामुळे अनेक ठिकाणी रेती वाहतूक सायंकाळी किंवा रात्री करण्याची गरज उद्भवत होती. याशिवाय, जलसंपदा किंवा इतर पायाभूत प्रकल्पांच्या वेळेत पूर्ततेसाठीही ही वाहतूक आवश्यक ठरत होती. तसेच परराज्यातून येणार्‍या रेती वाहतुकीला पूर्वीपासून 24 तास परवानगी असल्यामुळे राज्यांतर्गत वाहतूकदारांमध्ये असमतोल निर्माण झाला होता. नवीन निर्णयामुळे हा तिढा सुटणार असून, वाहतुकीचा कार्यक्षम उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रेती उत्खननाच्या वेळेला बंधन राहणार असले, तरी वाहतुकीसाठी आता सुविधा आणि लवचिकता उपलब्ध झाली आहे. मात्र, जीपीएस, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक अटींचे काटेकोर पालन करणे भाग आहे. प्रशासन आणि वाहतूकदार यांच्यातील समन्वयामुळेच या निर्णयाचा लाभ प्रत्यक्षात दिसून येईल.

निर्णयासंबंधी मार्गदर्शक सूचना
4उत्खनन वेळेत काढलेली रेती स्वतंत्र ॠशे-ऋशपलळपस केलेल्या ठिकाणी साठवणे बंधनकारक. 4सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान उत्खनन क्षेत्रात वाहनांची ये-जा पूर्णतः बंद. वाहने अखड-140 खठछडड प्रमाणित जीपीएस डिव्हाइसेस असलेली असावी.4रेती साठवलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य, त्याचे रेकॉर्डिंग दर 15 दिवसांनी तहसीलदार कार्यालयात सादर करणे बंधनकारक.4वाहतुकीसाठी केवळ वैध शढझ असणे आवश्यक; मुदत संपल्यानंतरची वाहतूक बेकायदेशीर समजली जाईल.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago