पावसाळा म्हणजे गारवा, सरींचा आनंद आणि त्याचबरोबर अनेक अडचणीही. यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे कपड्यांवर लागणारे चिखलाचे डाग. शाळेत जाणारी मुले, ऑफिसला धावणारे कर्मचारी किंवा बाहेरच्या कामासाठी घराबाहेर पडणारी कोणतीही व्यक्ती सगळ्यांनाच या डागांचा त्रास होतो. हे डाग केवळ दिसायला कुरूप नसतात, तर ते काढणेही तितकेच कठीण असते. पण काळजी करू नका. तुमच्या घरातल्या काही सोप्या गोष्टींच्या वापराने तुम्ही हे डाग सहज काढू शकता.
1. आधी चिखल सुकू द्या आणि नंतर झाडा.
2. थंड पाण्याचा वापर करा.
सुकलेला चिखल झाडून झाल्यावर कपडे थंड पाण्याने धुवा. गरम पाणी वापरल्यास डाग अजून खोल जाऊ शकतात व निघण्यास कठीण होऊ शकते.
3. बेकिंग सोडा वापरा.
एक चमचा बेकिंग सोड्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट डागांवर लावा आणि 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे डाग निघण्यास मदत होते.
4. लिंबाचा रस लावा.
लिंबामध्ये असलेले सॅट्रिक अॅसिड डाग साफ करण्यासाठी प्रभावी ठरते. लिंबाचा रस डागावर लावून काही वेळ ठेवा आणि नंतर कपडे धुवा.
5. पांढरा व्हिनेगर वापरा.
डाग हटत नसेल तर एक कप पाण्यात दोन चमचे पांढरा व्हिनेगर मिसळा. हा घोल डागांवर लावा, थोडा वेळ ठेवा आणि नंतर धुवा. ही पेस्ट तुमच्या कपड्यातील डाग आणि दुर्गंधी दोन्ही दूर करते.
6. डिटर्जंटचा चांगला वापर करा.
वर दिलेले उपाय करून झाल्यावर चांगल्या क्वालिटीच्या डिटर्जंटने कपडे धुवा किंवा वॉशिंग मशिनमध्ये टाका. याने उरलेले डागही निघून जातील.
7. नाजूक कपड्यांसाठी ड्राय क्लिनिंग करा.
जर कपडे अतिशय नाजूक असतील जसे की, सिल्क किंवा उबदार कपडे तर घरच्या घरी उपाय करण्याऐवजी ते कपडे ड्राय क्लिनिंगला द्या. यामुळे कपडे स्वच्छ होतील व कोणते नुकसानही होणार नाही.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…