संघर्षातून उभी राहिलेली धैर्याची कहाणी

पुणे शहरात प्रवास करताना रिक्षावाल्यांची टाळाटाळ ही काही नवी गोष्ट नाही. जेवायची वेळ झाली, दुसरे भाडे आहे, अशा अनेक कारणांनी ते ग्राहकांना नकार देताना दिसतात. पण अशाच परिस्थितीत एका महिला रिक्षाचालक ताईंची भेट झाली आणि तो अनुभव खास ठरला.
कोथरूडच्या मनीषा शिंदे गेल्या दीड वर्षांपासून रिक्षा चालवतात. सहज संवाद साधला असता, त्यांनी आपली कहाणी उलगडली. मनीषा म्हणाल्या, की पुण्यात आजघडीला 9-10 महिला रिक्षा चालवतात. पुरुष रिक्षाचालकांच्या बायका धुणीभांडी करून उदरनिर्वाह करतात. पण मी धुणीभांड्यांऐवजी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. यात माझ्या पतीनेही मला साथ दिली, ते स्वतः ओलाचालक आहेत.
रोजंदारीबाबत सांगताना त्या पुढे म्हणाल्या, की दररोज साधारण 700-800 रुपयांची कमाई होते. यातून 100-200 रुपये गॅसवर खर्च होतात. म्हणजे दिवसाला 600-700 रुपये हातात पडतात. धुणीभांड्यांच्या कामातून एवढे उत्पन्न मिळाले नसते. सुरुवातीला रस्ते चुकायचे, पण आता शहराच्या कानाकोपऱ्यांत निःसंकोच जाते.
पुरुष रिक्षाचालक अनेकदा जवळच्या भाड्यासाठी कंटाळा करतात. मात्र, मनीषा कोणतेही भाडे नाकारत नाहीत. हो, लोक कधी हिणवतातही. पण माझ्या कष्टाने पैसा कमावतेय, हे समाधान खूप मोठं आहे, असे त्या ठामपणे म्हणाल्या.
ठाणे-मुंबईसारख्या पुण्यातही गुलाबी रिक्षा सुरू झाल्या, तर महिलांविषयीचा आदर आणि प्रवाशांचे कुतूहूल वाढेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
आजच्या काळात समाजातली ही रिक्षावाली ताई फक्त रिक्षा चालवत नाही, तर धैर्य, आत्मविश्वास आणि सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवत आहे.

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

14 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

14 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

14 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

14 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

15 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

15 hours ago