नाशिक

मुकणे प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

मनपा आयुक्तांच्या सूचना; शहराची 30 वर्षांची पाण्याची सोय

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुकणे धरण प्रकल्पाची मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पामुळे शहराची पुढील 30 वर्षे पाण्याची सोय होणार आहे. पाणी सुरक्षेची भक्कम पायाभरणी करण्यासाठी नाशिक महापालिकेने मुकणे प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. यात जलशुद्धीकरण प्रकल्प व संलग्न कामे अशा कामांचा समावेश आहे. मनपा आयुक्तांंनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि आधुनिक करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील नव्याने विकसित होणार्‍या भागांसह सर्व नागरिकांना भविष्यात 24 बाय 7 अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे. या प्रकल्पाद्वारे सार्वजनिक पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. यात मुख्यत: पाइपलाइन उभारणी करून, विल्होळी ते निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र (डब्ल्यूटीपी) पर्यंत पाइपलाइनचे काम करण्यात येणार आहे. विल्होळी येथून सिंहस्थाच्या द़ृष्टीने थेट साधुग्राममध्ये पाण्याची ऊर्ध्व वाहिनी आणली जात आहे. विल्होळी येथे अतिरिक्त 274 एमएलडी, डब्ल्यूटीपी आणि दोन एमएलडी एमबीआर प्रकल्प, एमएस ग्रॅव्हिटी मेन पाइपलाइन, 15.70 किलोमीटर लांबीची 1800 मिलिमीटर व 1400 मिलिमीटर पाइपलाइन डीआय ग्रॅव्हिटी मेन पाइपलाइन, 7.90 किलोमीटर लांबीची 1200 मिलिमीटर पाइपलाइन एमबीआर प्रकल्प, निलगिरी बाग येथे दोन एमएलडी एमबीआर प्रकल्प ईएसआर कामे वाढीव पाणीपुरवठ्यासाठी उंच जलकुंभाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण शहरात 24 बाय 7 अखंड आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. पुढील तीस वर्षांसाठी शहराची जलसुरक्षा मजबूत होण्यास मदत होणार आहे. टप्प्याटप्प्याने पाइपलाइन बदल, नेटवर्क सक्षमीकरण आणि मीटरिंगच्या माध्यमातून सध्याचे 49 टक्के पाणीगळतीचे प्रमाण कमी करून ते 20 ते 25 टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अशी होणार निधीची उभारणी

महापालिकेने 25 फेब्रुवारीला प्रथमच दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड सार्वजनिकरीत्या जारी करून हरित वित्त व्यवस्थापन क्षेत्रात पाऊल उचलले. यातून उभारलेला दोनशे कोटींचा निधी मुकणे प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच 25 टक्के हिस्सा (100 कोटी) हा अर्बन चॅलेंज फंडअंतर्गत अपेक्षित आहे. राज्य शासन अथवा महापालिका प्रशासनाकडून उर्वरित 100 कोटींंची पूर्तता केली जाईल. या प्रकल्पासाठी 371.75 कोटींचे कार्यादेश 24 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आले असून, कामास सुरुवात झाली आहे. कामे पूर्ण होण्याची मुदत मार्च 2027 ठरविण्यात अली आहे.

पुढील तीस वर्षे सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने मुकणे प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत, सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. याद्वारे पाणीगळतीचे प्रमाण कमी होणार असून, महापालिकेच्या मालमत्ता करात भर पडणार आहे. – मनीषा खत्री, आयुक्त, मनपा

Mukane project work in progress

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago