नाशिक

मुक्तचे विशाखा काव्य पुरस्कार जाहीर

 

 

अक्षय शिंपी, देवा झिंजाड, नामदेव कोळी यांचा सन्मान

 

नाशिक : प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहाला देण्यात येणारा 2021 या वर्षासाठी विशाखा काव्य पुरस्कार अक्षय शिंपी, देवा झिंजाड आणि नामदेव कोळी यांना जाहीर झाला आहे. ही  माहिती कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी दिली. या पुरस्कारासाठी निर्धारित मुदतीत प्राप्त झालेल्या कवितासंग्रहांची प्राथमिक निवड समितीद्वारे छाननी करण्यात आली. प्राथमिक समितीने निवडलेल्या निवडक काव्यसंग्रहांचे  परीक्षण अंतिम निवड समितीने केले.

या समितीमध्ये डॉ. अभिजित देशपांडे, डॉ. श्यामल बनसोड, नितीन भरत वाघ, रामचंद्र कांळुखे, प्रवीण दामले, श्रीमती विशाखा डावखर यांचा समावेश होता. अक्षय शिंपी यांच्या बिनचेहर्‍याचे भिन्न तुकडे या संग्रहाला प्रथम क्रमांक, देवा झिंजाड यांच्या सगळ उलथवून टाकलं पाहिजेफ या काव्य संग्रहाला व्दितीय, तर नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या संग्रहाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या कवींचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, कुलसचिव भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

घोटेवाडीत सहा ट्रॉली कडब्यासह 55 टन मुरघास आगीत भस्मसात

दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…

14 minutes ago

नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन सायकल भेट

नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…

29 minutes ago

डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध घटनांचे उपनगरला प्रदर्शन

उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…

36 minutes ago

भैरवनाथ यात्रोत्सवात 27 वर्षांपासून मोफत चरणसेवा

सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील…

23 hours ago

घरकुल अनुदानात 50 हजारांची वाढ, 15 हजारांच्या अनुदानासाठी सौर यंत्रणा आवश्यक

सिन्नर : भरत घोटेकर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामांसाठी दिले जाणारे 1 लाख…

24 hours ago

इंदिरानगर कलानगर चौकात बसथांबा नसल्याने विद्यार्थी, प्रवासी त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी वडाळा ते पाथर्डी रस्त्यावरील कलानगर चौकात बसथांब्याअभावी भरउन्हात विद्यार्थी व प्रवाशांना उभे…

24 hours ago