नाशिक

आजपासून व्हॅलेंटाईन वीक धूम

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

प्रेम या अडीच अक्षराच्या शब्दात प्रत्येकाच आयुष्य सामावलेल असतो. नाते कोणतेही असो नात्याचा मुळ पाया प्रेमावर अवलंबून असतो. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की तरूणाईला व्हॅलेंटाईन डे चे वेध लागतात. मात्र व्हॅलेंटाईनच्या आधी व्हॅलेंटाईन वीक प्रेमी युगलाकडून साजरा केला जातो. केवळ व्हॅलेंटाईन डेच नाही, तर इतर दिवस आणि  व्हॅलेंटाईन डे ला महत्त्व आहे.  7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत वेगवेगळे डे साजरे करण्यात येतात.  प्रेमाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक  हा विशेष आठवडा केवळ जोडप्यांकडूनच साजरा केला जात नाही, तर आपल्या प्रेमाच्या आवडीच्या व्यक्तीबद्दल  आपल्या भावना  आदर ही अनेक जण व्यक्त करत असतात. त्यातून  प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त केली जात असते.  विशेष म्हणजे अनेकजण हा आठवडा मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा आठवडा विशेषता प्रेमात असलेल्या लोकांसाठी आहे. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा  महिना आहे. व्हॅलेंटाईन वीक असल्याने या महिन्यात लव्ह बर्ड्समध्ये उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे आजपासून सुरू होणार्या व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी तरूण वर्गाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.   येणार्या सात दिवसात डे साजरे करत नात्यांची वीण घट्ट केली जाणार आहे.

 

 

व्हॅलेंटाईन वीक साठी बाजारपेठ सज्ज

व्हॅलेंटाईन वीकची तरूण वर्गाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे..त्याप्रमाणेच व्हॅलेंटाईन डे साठी बाजारपेठही सज्ज झाली आहे..बाजारपेठेत व्हॅलेंटाईनसाठी खास गिफ्ट,टेडी ,चॉकलेट , रोझ यांनी बाजारपेठ सजली आहे.

 

 

असा आहे व्हॅलेंटाईन वीक

 

 

7 फेब्रुवारी :रोझ डे

 

8 फेब्रुवारी :प्रपोज डे

 

 

9 फेब्रुवारी :चॉकलेट डे

 

 

10 फेब्रुवारी :टेडी डे

 

 

11 फेब्रुवारी :प्रोमिस डे

 

 

12 फेब्रुवारी : हग डे

 

 

13 फेब्रुवारी : किस डे

 

 

 14 फेब्रुवारी :व्हॅलेंटाईन डे

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago