नाशिक :प्रतिनिधी
वांद्रा ( मुंबई ) येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर आज जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वांत मोठे वसतिगृह उभारणार असून , या वसतिगृहात सारथी , महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती धर्माच्या समुदायातील मुला – मुलींना प्रवेश दिला जाईल , अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली .उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींच्या वसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन ” भुजबळ , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , आमदार नरेंद्र दराडे , मोहम्मद इस्माईल , माजी आमदार अनिल कदम , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी गंगाथरन डी . उच्चशिक्षण संचालक डॉ . धनराज माने , महाज्योतीचे संचालक प्रा . दिवाकर गमे , सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी . डी . देशमुख आदी उपस्थित होते .
आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे . उच्च शिक्षणाची कास घरून आपले भवितव्य , पालकांचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे . आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेऊन एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी , असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले .
एकोप्याची भावना दृढ होणार : पालकमंत्री
मातोश्री मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून , या वसतिगृहात महाज्योती , सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थिनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे व एकत्रित शिक्षणाने सर्वामध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे . लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे .
वसतिगृहनिर्मिती चळवळ राबविणार : सामंत
आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी , औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी दोन वसतिगृहे सुरू करणार आहेत व भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत . मातोश्री मुलींच्या वसतिगृहात २०० विद्यार्थी क्षमता असून , यात ७५ विद्यार्थी सारथी संस्थेकडून ७५ विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून व ५० विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत . या कार्यक्रमास शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज , एचपीटी कॉलेज , के.टी.एच.एम. कॉलेज , स्काऊट , एन.सी.सी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…