निकृष्ट काम : दहा मीटर लांबीचा रस्ता तोडला
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 28 ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. दरम्यान, त्र्यंबकरोडवरील वेद मंदिरासमोर काही दिवसांपूर्वी केलेल्या रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याचे समोर आल्याने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत दहा मीटर रस्ता तोडण्यात आला. तसेच या रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराला प्रति दिवस 1 लाख 84 हजारांचा दंड ठोठावला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्राधिकरणांतर्गत तेराशे कोटी खर्च करून रस्ते करत आहेत. यात सिमेंट व डांबरी रस्त्यांचा समावेश आहे. ही रस्ताकामे मार्च 2027 पर्यंत मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मक्तेदारांना काम देताना प्रशासनाने त्यांना पुढील वर्षीच्या मार्च महिन्याची डेडलाइन दिली आहे. दरम्यान, रस्ताकाम करताना गुणवत्तेकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे. त्यानुसार सुरू असलेली रस्ताकामे स्वत: आयुक्त प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत आहेत. महापालिकेसह सिंहस्थ प्राधिकरणाचेदेखील रस्तेकामांच्या दर्जावर लक्ष आहे.
मनपा आयुक्त खत्री यांंनी बुधवारी (दि. 1 जुलै) त्र्यंबकरोडवरील वेद मंदिरासमोर झालेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांना रस्त्याला क्रॅक दिसले. त्यामुळे दर्जाबाबत संशय आल्याने त्यांनी दहा मीटरच्या आसपास रस्ता जेसीबीने तोडण्याचे आदेश दिले. रस्ता तोडताना त्या स्वत: तेथे उपस्थित होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल व कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदी उपस्थित होते.
डी. सी. अजमेरा या मक्तेदार संस्थेकडे सदर रस्त्याचे काम आहे. संबंधित ठेकेदाराला गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, या रस्त्याचे काम झाल्यानंतर जो मॅच्युरिटी पिरीयड असतो तेवढ्या कालावधीपर्यंत वाहनांचा वापर बंद ठेवणे आवश्यक आहे. मात्र, याकडे या ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याने येथून काही वाहने गेली. परिणामी, त्याचा रस्त्यावर परिणाम झाल्याचे बोलले जाते. रस्ता बंद असताना त्यावरून वाहने जाणार नाहीत, याची जबाबदारी त्या ठेकेदाराचीच असते.
रस्त्यांची कामे करताना त्यांचा दर्जा तपासला जात आहे. शहरात कुठेही रस्त्याचे काम निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. मक्तेदारांनी याबाबत काळजी घ्यावी.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा
Municipal Commissioner slams road contractor
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…