सहा विभागांतील बाराशे जणांची यादी तयार
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेवर थकबाकीचा डोंगर सातशे कोटींच्या पुढे गेला आहे. मनपासमोर आता चालू मागणीबरोबरच मागील थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. दरम्यान, मनपाच्या करसंकलन विभागाने सहाही विभागांतील प्रत्येकी दोनशे याप्रमाणे बाराशे थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. या सर्वांना आज, मंगळवारपासून (दि.2) जप्तीच्या नोटिसा धाडल्या जाणार आहेत.
शहरात सहा लाख बारा हजार मिळकतधारक आहेत. मात्र, यातील अनेकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरलेली नाही. परिणामी थकबाकीचा फुगवटा प्रत्येक वर्षी वाढताना दिसत आहे. मागील तीन-चार महिने महापालिका निवडणुकीत गेल्याने शहरातील नाशिकरोड, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, सातपूर, पंचवटी या विभागांतील कर भरण्यावर परिणाम झाल्याचे दिसले. कर संकलनचे अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्याने करवसुली थंडवली. मात्र, महापालिकेने थकबाकी वसुलीकरिता सहाही विभागांतील थकबाकीदारांना सोमवारपासून जप्तीच्या नोटिसा धाडण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाने ढोल वाजवून त्याद्वारे थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता.
महापालिकेला सहकार्य करावे
थकबाकीदारांनी महापालिकेला सहकार्य करावे. सोमवारपासून थकबाकी असणार्यांना नोटिसा धाडल्या जात असून, त्याद्वारे थकबाकीची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न आहे.
– अजित निकत, उपायुक्त, करसंकलन, मनपा
Municipal Corporation to issue seizure notices to big defaulters from today
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…