माजी नगरसेवक दिनकर पाटील यांची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्याची प्रक्रीया सुरु आहे. मात्र नाशिक महानगरपालिकेतील शाळांमध्ये प्रवेशासाठी मुख्याध्यापकच गैरहजर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची व पालकांची गैरसोय होत असून पालकांना विविध अडचनींना सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच पालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्याना 15 जूनपूर्वी शाळा सुरु होण्यापूर्वी त्वरीत गणवेश देण्यात यावा. अशी मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत. त्या शाळातील सर्व जाती धर्माच्या गोरगरीब कुटुंबातील विद्याथ्यांना मुला मुलींना गणवेश तात्काळ देण्यात यावेत. पालिकेच्या शाळांमध्ये मुख्यध्यापक अनुपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. परिणामी याचा फटका शाळांना बसून शाळेची पट संख्या घटत आहे. या सर्व प्रकाराला शिक्षक जबाबदार असून मनपा शिक्षण विभागातील प्रशासन सुध्दा यास जबाबदार असून प्रशासनाचे शिक्षण विभागाकडे झालेले दुर्लक्ष ही कारणीभूत असल्याचा आरोप माजी नगरसेवक पाटील यांनी केला आहे. दरम्यान महापालिका शाळातील इयत्त्ता ते आठवी पर्यतच्या सर्व विद्यार्थ्याना मोफत गणवेश दिला जातो. चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्यासाठी काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असताना, विद्यार्थ्याना मोफत गणवेश मिळ्णार कधी, गणवेशासाठी अद्याप कोणत्याही हालचाली दिसत नाहीये. महापालिकेच्या शंभरहून अधिक शाळा असून त्यामध्ये 28 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी राखीव प्रवर्गातील 18 हजार विद्यार्थ्याना राज्या शासनाकडून गणवेश दिला जातो. तर उर्वरीत दहा हजार विद्यार्थ्याच्या गणवेशाचा खर्च महापालिका स्वत: करते. दरवर्षी शाळा सुरु होउन दोन महिन्यांनी विद्यार्थ्याना गणवेश मिळ्तेो. मात्र यंदा गणवेशासाठी विलंब होता कामा नये. त्यामुळे 15 जूनपूर्वी विद्यार्थ्याना गणवेश मिळावा अशी मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…