दिंडोरी: प्रतिनिधी
नाशिक पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे, दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथे वडिलांनी शेतात कामाला जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने संतापाच्या भरात फावड्याने जन्मदात्याचा खून करून मुलगा फरार झाला, साहेबराव मालसाने असे या पित्याचे नाव आहे. दिंडोरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने वय 55 , यांनी त्यांचा मुलगा पप्पु उर्फ हिरामन साहेबराव मालसाने याला शेतात काम करायला जा असे सांगितले .याचा पप्पु ( हिरामण )याला राग आला त्याने मागचा पुढचा विचार न करता संतापाच्या भरात साहेबराव मालसाने यांच्या डोक्यात ,पाठीमागे , हातावर , पायावर फावड्याने मारुन गंभीर दुखापत केली.अचानक व अनपेक्षित झालेल्या हल्यामुळे साहेबराव हे गर्भगळीत झाले व हल्ला जीवघेणा ठरला व ते ठार झाले. गोरख साहेबराव मालसाने यांनी पप्पु मालसाने यांचे विरोधात फिर्याद दिल्याने दिंडोरी पोलिसांनी पप्पु ( हिरामण ) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट पुढील तपास करत आहेत. घटना घडल्यानंतर संशयीत पप्पु मालसाने हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…
इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…
सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…
नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…
ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको : विशेष प्रतिनिधी असे…