पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची ‘एसीबी’ चौकशी करा ! – विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मागणी

पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची
‘एसीबी’ चौकशी करा !

– विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मागणी

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
ठाण्यात अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे व मुळचे नाशिककर असणारे पोलिस निरीक्षक शेखर बागडे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या रडारवर आले आहेत. बागडे यांनी कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करताना नाशिकमधील मालमत्तेची यादीच वाचून दाखवली. बागडे विरोधात उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून याप्रकरणात ‘एसीबी’ चौकशी व्हावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.
राज्यातील बहुचर्चित जाहिरात प्रकरणावरून विरोधी पक्ष नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. मात्र त्यात बागडे प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. डोंबिवलीत भाजपा पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपा-शिवसेना युतीत ठिणगी पडली असून त्याचा केंद्रबिंदु पोलिस निरीक्षक बागडे ठरले आहेत.
बागडे यांच्या मालमत्तेची यादी वाचून दाखवताना
शेखर बागडे ठाणे जिल्ह्यात काम करतोय, त्याने मोठी मालमत्ता निर्माण केली आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. “एक पोलीस एवढी बेहिशोबी मालमत्ता कशी काय गोळा करू शकतो? सरकारने यासंदर्भात चौकशी करावी”, असं अजित पवार म्हणाले. वरिष्ठ पोलीस निरिक्षण शेखर बागडे यांनी जी बेहिशोबी मालमत्ता जमा केली त्याबाबत ‘एसीबी’ चौकशी व्हावी, असे पवार म्हणाले.
—————————————————-

२९ कोटींच्या मालमत्तेची यादी व्हायरल

वादग्रस्त ठरलेले पोलिस निरीक्षक शेखर बागडे हे मुळचे भगूरचे असून त्यांनी नाशिकसह दहशतवाद विरोधी पथक ठाणे आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. मात्र डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यातील कारकीर्दीत त्यांच्यावर बालंट ओढावले आहे. बागडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची यादी व्हायरल झाली असून हीच यादी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवल्याचे बोलले जात आहे.
या यादीत नाशिकमधील सुमंगल रेसिडेन्सी (महात्मानगर) येथील सदनिका, देवळाली कॅम्प येथील व्यावसायिक मालमत्ता, तिरुमला हाईटस् (रविवार पेठ) येथील सदनिका व दुकान, रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शनमधील भागीदारी, भगूरसह शेनित (इगतपूरी) शेतजमीन, सिन्नर-घोटी मार्गावरील फार्महाऊस, देवळाली कॅम्प येथील बंगला, ठाण्यातील मालमत्ता तसेच बँकातील जमा रक्कम व ठेवींचा उल्लेख आहे. ही मालमत्ता व्हायरल झालेल्या यादीनुसार २९ कोटी ५२ लाखाहून अधिक किंमतीची आहे.

व्हायरल झालेली मालमत्ता यादी

 

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago