नाशिक

अवघ्या चार तासांत खुनाच्या आरोपींचा पर्दाफाश

मुख्य सूत्रधारासह तिघे आरोपी जेरबंद, गंगापूर पोलिसांची धडक कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून आपल्या अल्पवयीन बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरून अगदी शेजारी शेजारीच राहणा-या युवकाचा गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फाशीच्या डोंगर परिसरात सोमवारी खून केल्याची घटना घटना घडली. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातील तीनही आरोपींना गंगापूर पोलिसांनी अवघ्या चार तासांत गजाआड केले आहे.
या गुन्ह्यातील तीन तरुणांनी एका परप्रांतीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्यास मृतावस्थेत सोडून दिल्याची धक्कादायक घटना जुना दत्तमंदिर रोड, शिवाजीनगर परिसरात घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली आहे.
याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 26) सायंकाळी सातच्या सुमारास गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळ अपार्टमेंटसमोर शिवाजीनगरमध्ये एकजण जखमी अवस्थेत पडलेला असल्याची खबर मिळाली. याबाबत मृत तरुणाच्या काकाने गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम महाजन आणि गुन्हेशोध पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे एकजण हालचाल न करता पडलेला दिसला. त्याची अंगझडती घेतली असता, नसीम शहा (रा. भुईगाव, उत्तर प्रदेश) अशी ओळख पटली. त्यास त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
गंगापूर पोलिसांनी या खुनाच्या घटनेचे तपासचक्र सुरू केले असता त्यांना सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटली. घटनास्थळी साक्षीदारांकडून आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती घेतल्यानंतर या खुनाच्या घटनेतील तीन संशयित आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत त्यांच्या मागावर जाऊन त्यांना सिन्नर फाटा व चांदोरी, सायखेडा परिसरातून विशाल दिनेश तिवारी (रा. कार्बन नाका, सातपूर), आदित्य दत्ता वाघमारे (रा. कार्बन नाका, सातपूर) वैभव विनायक भुसारे (रा. अशोकनगर, सातपूर) या संशयितांना अटक करण्यात आली.
या यशस्वी कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहआयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम महाजन, पोलिस निरीक्षक शरद पाटील आणि गुन्हेशोध पथकातील गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रहेरे, सोनू खाडे, सुजित जाधव, जयवंत बागूल, गोरख साळुंके, मच्छिंद्र वाकचौरे, मुकेश गांगुर्डे, राकेश राऊत, घनश्याम भोये आदींनी केली. काही गंगापूर पोलिसांचे या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.

Gavkari Admin

Recent Posts

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

1 day ago

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…

1 day ago

दहापट पैसे कमवायला गेली…खेळण्याचे पैसे घरी घेऊन आली

शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…

2 days ago

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला   शहापूर :  साजिद शेख एका…

3 days ago

आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…

3 days ago

उज्ज्वल निकम होणार खासदार

उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…

3 days ago