बागलाण तालुक्यात मजुराचा खून

सटाणा प्रतिनिधी :

शहरापासून ऐक किमी अंतरावर कंधाना फाट्याजवळ एका शेत मजुराच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

घमजी रंगनाथ माळी (वय ५०) रा. पिंगळवाडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सटाणा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की मोरे नगर शिवारातील शेतकरी जितेंद्र सोनवणे यांच्या शेतात शेत मजूर म्हणून काम करत असलेला घमजी रंगनाथ माळी शनिवारी बाजार करण्यासाठी घराबाहेर पडले होते.रात्री उशिर झाला तरी पती न आल्यामुळे पत्नी चिंतेत होती.त्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंधाना फाट्याजवळ विलास दादाजी सोनवणे यांच्या शेता जवळ घमजी माळी यांचा मृतदेह आढळून आला.
अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला होता.ओळख पटू नये म्हणून दगडाने त्यांचा चेहरा ठेचाण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील,पोलिस हवलदार हेमंत कदम, जिभाऊ पवार, अजय महाजन,भास्कर बस्ते,प्रकाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.मृतदेहाचे जवळून निरीक्षण केल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *