नाशिक: प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या तसेच घरगुती हिंसाचाराच्या घटना काही केल्या कमी होण्यास तयार नाही, इंदिरानगर भागात असलेल्या एका पेट्रोल पंपमागील भागात महिलेचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेचा खून करून संशयिताने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. निशा मयूर नागरे असे या महिलेचे नाव असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, सध्या पोलीस शोध घेत आहेत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.