अज्ञात तरुणाचा खून: कुठे घडली घटना, नाशिक हादरले

अज्ञात तरुणाचा खून
कुठे घडली घटना, नाशिक हादरले
पंचवटी: प्रतिनिधी
राज्याचे अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी शहरातील तसेच विभागातील गुन्हेगारीचा आढावा घेऊन 24 तासही उलटत नाही तोच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली. एका अज्ञात 20 ते 25 वयाच्या युवकाचा खून झाला असून, त्याची ओळख पटलेली नाही, चामर लेण्याच्या मार्गावर रविवरी पहाटे ही घटना घडली, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढीस लागली आहे. पोलीस ठाण्याचे कारभारी देखील बदलण्यात आले आहे त्यामुळे तरी गुन्हेगारीला आळा बसेल का असा सवाल नागरिक करीत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago