पंचवटीत पोलिसाच्या मुलाचा खून

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांनी व्यक्त केला संशय !

सिडको: दिलीपराज सोनार

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री  पोलिस सेवेतुन निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्येतील मारेकऱ्यांचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वस्तीगृहाबाहेर गगन आकाश कोकाटे,( २८, वृंदावन नगर, म्हसरूळ,) या युवकाची मंगळवार दि. २० रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बुधवार दि. २१ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

याघटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यावेळी पोलिसांना मयत गगन कोकाटेच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली असल्याची माहिती आहे. हत्या घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली आणि हि हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केला आहे. या हत्येतील मारेकऱ्यांचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आसुन यातील अरोपींना लवकर च जेरबंद करण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

4 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

4 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

4 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

5 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

5 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

5 hours ago