अनैतिक संबधातून मेहुणीची हत्या

मेव्हण्याचे कृत्य, जमावाने घर पेटविल्याचा बनाव उघड
इगतपुरी : प्रतिनिधी
पहिल्या दोन बायका असतानाच सख्या मेहुणीने लग्नाचा तगादा लावला. मात्र, लग्नास नकार दिल्यामुळे मेहुणीने घर पेटवून दिल्याने संताप अनावर झालेल्या मेव्हण्याने धारदार शस्त्राने मेहुणीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर जमावाने मेहुणीची हत्या केली व घरे पेटवून दिल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसी तपासात अनैतिक संबधातून हा प्रकार मेहुण्यानेच केल्याचे उघड झाले. अधरवड येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपी शरद वाघ हा आपल्या दोन पत्नींसोबत अधरवड ताराची वाडी येथे राहत असताना नांदगाव तालुक्यातील त्याची मेहुणी लक्ष्मी संजय पवार (24) ही राहण्यास आली. यादरम्यान त्यांच्यात अनैतिक संबध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मी ही शरदकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, शरदला अगोदरच दोन बायका असल्याने व या दोन्ही लक्ष्मीच्या बहिणीच असल्याने त्यांना असलेली मुले यांच्या संगोपनाची जबाबदारी असतानाच पुन्हा तिसरी पत्नी नको म्हणून शरदने नकार दिला. लग्न करत नाही तर मी तुझे घर जाळील अशी धमकी देत झोपडीवजा खोपी खरोखर पेटून दिली या आगीत शेजारची अन्य दोन तीन घरे (खोपी) जळून खाक झाली.घर जाळल्याच्या रागातून शरदने घरातीलच कोयत्याने मेहुणी लक्ष्मी पवार हिच्या मानेवर प्रहार केल्याने ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर शरदने पहाटेच्या दरम्यान आदिवासी समाजाचे चाळीस ते पन्नास लोक आले त्यांनी जमिनीच्या वादातून मारझोड करत आणि त्यांनी आमची घरे पेटवून दिली व लक्ष्मी हिची हत्या केली. असा बनाव रचला. तशी फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी शरदची कसून चौकशी केली असता त्याने आपणच हत्या केल्याची कबुली दिली. घर जाळल्याच्या रागातून शरदने घरातीलच कोयत्याने मेहुणी असलेल्या लक्ष्मी पवार हिच्या मानेवर प्रहार केल्याने ती जागीच गतप्राण झाली.
याबाबतची घटना पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक भोसले यांच्यासह घोटीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस पथक सहायक उपनिरीक्षक राऊत,जुंदरे, हवालदार सुहास गोसावी, शीतल गायकवाड, बसते,कचरे,मथुरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली, पंचनामा करून संशयित शरद महादू वाघ याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला.
——————————-

शरद महादू वाघ हा ऊसतोड कामगार असून, त्याला मीना व सावित्री या दोन बायका आहेत विशेष म्हणजे या सख्या बहिणी आहे. त्यात तिसरी बहीण लक्ष्मी ही देखील शरद सोबत राहत असल्याने त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. मयत लक्ष्मी हीदेखील विवाहित असून तिचे गेल्या दोन वर्षात दोन लग्न झालेले आहेत.त्यामुळे हातावरचा कारभार त्यात आधीच्या दोन बायका, मुले हा मोठा प्रपंच असल्याने घरात तिसरी नको म्हणून शरद मेहुणी लक्ष्मीशी लग्न करण्यास नकार देत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *