नाशिक

12 तासांत खुनाचा उलगडा

स्थानिक गुन्हे शाखेला यश

मालेगाव : प्रतिनिधी
शिवीगाळ व आपापसात वाद झाल्याचा राग मनात धरून 25 वर्षीय युवकाचा गळा आवळून खून करणार्‍या आरोपीस अवघ्या 12 तासांत पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
आले आहे.
शहरातील जुना आग्रा रोडवरील सुजन थिएटर येथे अमोल मोहन निकम (वय 25, रा. एकतानगर, गवळीवाडा, मालेगाव) या युवकाचा गुरुवारी (दि.26) गळा आवळून खून झाला होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी मयत अमोल हा एका मोटारसायकलवर बसून गेला असल्याचे पथकाला तपासात समजले होते. तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार संशयित विशाल मारूती गवळी (वय 38, रा. एच. पी. गॅस गोडावूनसमोर, कैलासनगर) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता, मयत अमोल याने संशयित विशाल यास शिवीगाळ केली होती.
तसेच आपापसात वाद झाल्याचा राग मनात धरून विशालने भगव्या रंगाच्या रुमालाने (गमछाने) मयताचा गळा आवळून जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली. या आरोपीस छावणी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, गिरीश निकुंभ, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, संदीप राठोड, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

 

Gavkari Admin

Recent Posts

पावसाळ्यात केसांची निगा

पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का? पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील…

13 hours ago

आषाढी एकादशी उपवासाचे पूर्ण ताट

वरण-सुरणाची आमटी, भात -भगर, भाजी-भोपळा, पोळी-राजगिर्‍याचे फुलके, चटणी-नारळाची, चिंचेची, खजुराची, सुरणाची, कोशिंबीर -काकडीची, लोणचे- लिंबाचे…

13 hours ago

किचन ते कॉन्फरन्स रूम

भारतीय संस्कृतीत स्त्री ही कायमच एक आधारस्तंभ मानली गेली आहे. आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी…

13 hours ago

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन

पळसेत बिबट्याचे भरदिवसा शेतकऱ्यांना दर्शन नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिकरोड शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असणाऱ्या पळसे…

14 hours ago

कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी…

15 hours ago

धोकादायक यशवंत मंडईवर हातोडा

मनपाकडून कार्यवाही; पाडकामाला महिना लागणार नाशिक : प्रतिनिधी रविवार कारंजा येथे 1968 मध्ये उभारलेल्या यशवंत…

15 hours ago