नाशिक: प्रतिनिधी
शहरात खुनाचे सत्र सुरूच असून, उपनगर हद्दीत प्रॉपर्टी च्या वादातून एकाचा खून झाल्यानंतर सातपूरला नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती, मधपी मुलाने आईचा निर्घृण खून करून बारा तास देखील उलटत नाही तोच रात्री साडे अकराच्या सुमारास नाशिकरोड शिवाजी नगर येथे वृद्ध महिलेला तिच्याच मुलाने गळा आवळून मारून टाकले, पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून आपण आईचा खून केल्याची कबुली दिली, या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाच दिवशी तीन खून झाले मात्र यातील दोन खून हे कौटुंबिक समस्येतून झालं आहेत.