लासलगाव : प्रतिनिधी
औरंगाबाद येथे एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुन फरार झालेला शरण सिंग सविंदर सिंग शेटी (20) या संशयितास लासलगाव येथील गणेश नगर भागातून त्याच्या बहिणीच्या घरातून पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने रविवारी दुपारी दोनच्या सुमारास जेरबंद करुन त्याला औरंगाबाद पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले.
वेदांत नगर येथे शनिवारी सुखप्रीत कौर उर्फ कशिश प्रतिपाल ग्रंथी या कॉलेज युवतीचा एकतर्फी प्रेमातून शस्त्राने वार करून शरण सिंग सविंदर सिंग शेटी याने खून केला होता. याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तलायातील वेदांत नगर पोलीस ठाण्यात फिर्याद शनिवारी दाखल झाली होती.या खुनानंतर शरण सिंग सविंदर सिंग शेटी हा फरार झाला होता. यासंशयिताचा शोध पोलिस यंत्रणा घेत होती.
याबाबत पोलीस आयुक्तलयातील वेदांतनगर पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी नाशिकचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना सदर संशयित आरोपी लासलगाव येथील त्याच्या बहिणीकडे आला असल्याची माहिती दिली होती.त्यानुसार खबर मिळताच गुप्तता पाळत तातडीने पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ ,पोलीस अंमलदार योगेश शिंदे, हवालदार संदीप शिंदे विजय बारगल यांच्या पथकाने रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लासलगाव येथील श्री गणेश नगर मधील गणेश मंदिरामागे त्याच्या बहिणीच्या घरात छापा टाकून फरारी झालेल्या शरण सिंग सविंदर सिंग शेटी यास ताब्यात घेतले.तातडीने ही घटना औरंगाबाद पोलिसांना कळविताच औरंगाबाद पोलिसांचे पथक लासलगाव येथे दाखल झाले आणि संशयित आरोपीस ताब्यात घेतले.
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…