दोन मजुरांना अटक
सटाणा: प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील नामपुर येथे पैशांच्या वादातून एका तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली असून जायखेडा पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
नामपुर कृषि उत्पन्न बाजारसमितीतील कांदा व्यापारी सचिन मुथा यांच्या कांद्याच्या खळ्यावर कामाला असलेल्या तीन मजुरांमध्ये पैशांवरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होवून बिकासकुमार आणि अनिल कुमार या दोन तरुणांनी मुकादम शिवानंद कामत (वय 41) याचा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी कांदा व्यापारी सचिन मुथा यांनी जायखेडा पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार मुकादम शिवानंद कामत आणि आरोपींमध्ये केवळ दोन हजार रुपये देण्याघेण्यावरून वाद झाला. आणि या वादातच दोघांनी मुकादम शिवानंद याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…