काही गोष्टी आयुष्यात जुळवून घेणं एक आणि काही गोष्टी आयुष्यात जुळून येणं एक..हे जुळून येणं जरी सहज भासल तरी ती सहजता मनाच्या हिंदोळ्यावर आपल्याला स्मितहास्य देतांना दिसते,आणि ह्यास आपण आयुष्यातील योगायोग म्हणून जवळ करतो.हा योगायोग काळाच्या चक्रात कधीच स्वतःला जखडून ठेवत नसावा बहुतेक,म्हणून की काय त्याचं अस्तित्व प्रत्येकासाठी आनंदाच्या सरी सोबत घेऊन येत.आपल्या मनीच्या सुप्त आकांक्षा आणि हा योगायोग यांची मैत्री फारच जुनी असावी.त्यांचं एकत्र होऊन वास्तवात उतरण ही गोष्टच मनास सुखाची चाहूल लागण्यासाठी परावृत्त करत असते.

योगायोग हा आपल्या स्वप्नांची पाऊलवाट परखत असावा अगदी नकळत..म्हणूनच,कदाचित योगायोग घडवला जात नाही तो घडून येतो.काही क्षण,प्रसंग जगणं आपलं स्वप्न असत,पण ह्याच क्षणांना आपल्याला भेटण्याची ओढ लागावी ही गोष्टच मुळात त्याच क्षणांना कणभर सोनेरी करून जाते.हे सोनेरीपण उजळवण्यासाठी हा योगायोग किती नितळपणे त्याची उपस्थिती प्रस्थापित करतो.

कधी माणसांच्या स्वरूपात तर कधी कुठल्या प्रसंगांच्या स्वरुपात हा योगायोग आपला अगदी लाघवी पाठलाग करतांना दिसतो.तर कधी आपल्यातल्याच अनामिक आशांना सत्यात उतरवून आपल्याच अस्तित्वाची खून सिद्ध करत असतो.योगायोग ही आयुष्य रंगीत करणारी एक अशी पहाट आहे जिचा जन्म होतांना बघणं बऱ्याचदा अनुभवणं राहून जात,पण तो मनात अनुभवला तरी आपल्या अंतःकरणास प्रसन्न करून जातो.आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुटतात काही अगदी सहज आपल्या सोबत राहतात,पण ज्या गोष्टी अप्रत्यक्षपणे आपल्यातल्या आनंदाला खत पाणी घालण्यासाठी सहज आजूबाजूस दरवळत असतात त्या मात्र जगण्यातली गोडी द्विगुणित करणाऱ्या ठरतात, त्यापैकीच एक म्हणजे हा “योगायोग”..

तेजश्री गोडसे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago