पंचवटीत पुन्हा खून, गुन्हेगारी थांबेना

पंचवटी : प्रतिनिधी

शहरात गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत चालली असून, आज सकाळी पंचवटी भागातील म्हसरूळ गुलमोहर नगर स्वामी समर्थ केंद्राजवळ एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुसुम एकबोटे असे या वृद्धेच नाव आहे.

म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनी परिसरात असलेल्या स्वामी समर्थ मंदिरानजीक असलेल्या राधानंद अपार्टमेंट मध्ये, कुसुम सुरेश एकबोटे ही महिला आपल्या मुलीसोबत गेल्या तीन चार वर्षापासुन भाड्याने रहात आहे आज बुधवारी सकाळच्या दरम्यान या विळाने 80वर्ष वृद्ध महिलेच्या मानेवर विळा मारुन खून केल्याची घटना घडली,
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरात रहाणा-यांचे जबाब नोंदवुन घेतले आहे पोलीस तपस सुरू करत असताना, या दोघी मायलेकींना कुणाचा सहारा नसल्याने त्यांची मुलगी ही काही बंगल्यामध्ये स्वयंपाक, झाड झुड धुणे भाड्याची कामे करत आहे वृद्ध महिलेची मुलगी कामांसाठी बाहेरगेल्यानंतर घरात कुसुम सुरेश एकबोटे ही वृद्ध महिला एकटीच असल्याचा फायदा घेऊन अज्ञात मारेक-याने कुसुम एकबोटे या वृद्धेच्या मानेवर घरदार विळा मारुन तिचा गळा चिरून खुन केल्याची घटना घडली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, मसरूळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे,यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पुढील तपास म्हसरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मारी करत आहेत दरम्यान या वृद्ध महिलेचा खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला याबाबत पोलिस तपास करीत आहेत.  शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, तोडफोड, कोयत्याने हल्ला या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना पोलीस यंत्रणा मात्र प्रकारचे गुन्हे रोखण्यात अपयशी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *