नाशिकरोड : येथील चेहडी पंपिंग परिसरात सिटी लिंक बसच्या मध्यपी असलेला बस चालक बस मागे घेताना पाठीमागून आजोबा सोबत शाळेतून घरी चाललेली सहा वर्षाची मुलगी सान्वी सागर गवई बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. सिटी लिंक चे बसचालक बेदरकारपणे बस चालवतात त्यामुळे वारंवार अपघात घडत असूनही सिटी लिंक व्यवस्थापन यात काहीही सुधारणा करण्यास तयार नाही, त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.