प्रगती की परिवर्तन,?
मविप्र च्या सत्तासंघर्षचा आज फैसला
नाशिक : प्रतिनिधी
मविद्य प्र शिक्षणसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी निवडीसाठी रविवारी ९४.९३टक्के मतदान झाले. जिल्ह्यात चांदवड तालुक्यात सर्वाधिक ९८.१०, तर नाशिक शहरात सर्वात कमी ८७.३३ मतदान झाले. सोमवारी (दि.२९) सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू होणार असून, रात्री ९ पर्यंत निकाल लागण्याची शक्यता निवडनुक मंडळाने व्यक्त केला. दरम्यान मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला देणार धक्का असा प्रश्न उपस्थित होत आहे
संस्थेच्या विद्यमान सरचिटणीस नीलीमाताई पवार, डॉ. सुनिल ढिकले, माणिकराव बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली प्रगती तर माजी सभापती ॲड नितिन ठाकरे, आ. माणिकराव कोकाटे, बाळा साहेब क्षीरसागर यांच्या परिवर्तन पॅनल मध्ये जोरदार रस्सीखेच दिसून आली. रविवारी (दि.२८) जिल्ह्यातील १४ मतदानकेंद्रावरील एकूण ५३ बूथवर मतदान झाले. त्यात सर्वाधिक मतदान चांदवडला ९८.१०, दिंडोरी व पेठ मध्ये ९७.०२ टक्के, देवळा ९७ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी नाशिकः शहरातून ८७.३३ टक्के त्याखालोखाल मालेगांव तालुक्यात ९२.७२ टक्के, सटाण्यात ९४.२८ टक्के मतदान झाले. एक महिन्यापासून दोन्ही पॅनल कडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. त्यात मुख्यत्वे सत्ताधारी पॅनल कडून केलेला विकास तर विरोधकांकडून सुरू असलेल्या कारभारावर टीका करण्यात आली. कोणत्या पॅनलचा कोणत्या तालुक्यात कसा जोर, होता ?याविषयी जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. नाशिक मतदान केंद्रावर उमेदवारांच्या समर्थकांसह सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी , संस्थेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होत
सेवक संचालकांसाठी ८८.३४ टक्के मतदान
सेवक संचालकांसाठीदेखील अटीतटीची लढत रविवारी झाली. या गटासाठी ४६३ मतदारांपैकी ४०९ मतदारांनी हक्क बजावला. गतवेळी या गटासाठी ९३.९७ टक्के मतदान झाले होते. यंदा हे मतदान सुमारे पाच टक्कयांनी घटून ८८.३४ टक्के मतदान नोंदविले गेले. सेवक संचालकांच्या तीन जागांसाठी दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. सेवक पॅनलकडून महाविद्यालयीन विभागासाठी संजय शिंदे, प्राथमिक माध्यमिक विभागासाठी चंद्रजित शिंदे व जगन्नाथ निंबाळकर हे तर समर्थ पॅनलकडून महाविद्यालयीन विभागसाठी डॉ. संपत काळे, प्राथमिक विभागाकडून रामराव बच्छाव व राजेश शिंदे हे रिंगणात आहेत.
– – –
रात्री ९ पर्यंत निकाल
किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवारी (२९)रोजी सकाळी ८ वाजे पासून मतमोजणी सुरू होईल. मराठा हायस्कूल जवळील रोंदल सभागृहात २४ टेबलवर होईल. रात्री ९ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता निवडणुक मंडळाने व्यक्त केली आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,
संस्थेच्या प्रगतीचा ध्यास बाळगत केलेले कामकाज निवडणुकीला सामोरे जातांना सभासदांपर्यंत पोहोचविले. संस्था चांगल्या हातात राहावी म्हणून समाजाच्या सर्व घटकांनी स्वतःची समजून निवडणुक हातात घेतली.सर्व स्तरावरुन साथ व मदत मिळाल्याचा आनंद होतो आहे. ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांची भक्कम साथ लाभल्याने आत्मविश्वास वाढला. खेडलेझुंगे येथील सभासद आनंद घोटेकर मतदानासाठी रांगेत उभे असतांना विरोधी समर्थक सभासदांनी संस्थेच्या सुसज्ज इमारती बघून विरोधक नाहक आरडाओरड करत असल्याची भावना व्यक्त करत आपले मत प्रगती पॅनलला दिल्याचे सांगितले. सर्वच सभासदांच्या मनातील भावना त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीत विविध स्तरावरुन साथ देणार्या व्यक्तींचे मनापासून आभार मानते.
-श्रीमती नीलिमाताई पवार,
प्रमुख, प्रगती पॅनल.
,,,,,,,,,,,,
गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी चालवलेला एककलमी कारभारामुळे यंदाच्या मवीप्र निवडणुकीत जिल्हाभर मतदानाचा टक्का ऐतिहासिक होता. सभासदांच्या मनात परिवर्तन ठरलेलं होत त्यामुळे मतदारांनी दाखवलेला उत्साह सर्वकाही सांगून गेला.परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित आहे.मी सर्व सभासद,हितचिंतक,प्रचारक यांचे आभार मानतो.
–
ॲड नितीन बाबुराव ठाकरे
परिवर्तन पॅनल.
,,,,News by,,devyani sonar,,,
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…