भुजबळ ब्रँड आहे आणि ब्रँडवरच निवडणूक लढवणार
नांदगाव तालुका भयमुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी ; समीर भुजबळ
मनमाड :आमिन शेख
नांदगाव तालुका हा भयमुक्त करण्यासाठी आणि जनतेच्या आग्रहाने मी येथे उमेदवारी करत असुन भुजबळ हा ब्रँड आहे आणि याच ब्रँडवर मी निवडणूक लढवणार आहे.येथील नेत्यांना तसेच जनतेला पुन्हा एकदा सन्मानाने जगवण्यासाठी आणि भयमुक्त जगण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार आहे आणि येत्या 28 तारखेला मी नांदगाव येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे माझ्यामुळे महायुतीला अडचण येऊ नये यासाठी मी आज माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता माझ्यावर कुणाचे बंधन राहिले नाहीत याशिवाय मी मुंबई आणि येवला याठिकाणी निवडणूक लढण्याची व्यवस्था करून आलो आहे . यामुळे माझी कमतरता भासणार नाही असेही समीर भुजबळ यांनी सांगितले. मनमाड येथील रामकुंज या त्यांच्या बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज मनमाड नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली यावेळीं त्यांनी आपल्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला यावेळी त्यांनी पत्रकाराशी चर्चा करतांना सांगितले की मनमाड नांदगाव मतदारसंघात विकासाच्या गप्पा केल्या जातात मात्र येथे विकास नाही तर भययुक्त वातावरण विद्यमान आमदारानी केले आहे येथील इतर पक्षाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांना धमक्या देऊन आपल्या सोबत घेतले आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत यात संतोष गुप्तां यांना गांजाच्या खोट्या केसेस मध्ये अडकवले याशिवाय माजी आमदार संजय पवार,माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांचेही तेच झाले आहे .मी गणपती काळात मनमाड नांदगाव मतदारसंघात फिरलो यावेळी सर्वसामान्य जनतेच्या भावना मी ऐकून घेतल्या. त्यांनी मला खाजगीत येऊन सांगितले की मनमाड नांदगावला दहशतमुक्त करण्यासाठी आपण येथे उमेदवारी करावी याशिवाय येथील नेत्यांनी देखील नांदगाव तालुक्याला तसेच येथील जनतेला या दहशतवादातून मुक्त करायचे असेल तर आपण उमेदवारी करावी. जनतेच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी अपक्ष उमेदवरी करणार आहे . येत्या 28 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असुन मनमाड व नांदगाव मतदारसंघातील जनतेने मला साथ द्यावी असे समीर भुजबळ म्हणाले. यावेळीं त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नांदगाव तालुका दहशतमुक्त करण्यात मला जनतेने साथ द्यावी याशिवाय नारपारचे पाणी मिळावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी पंकज भुजबळ आमदार असतांना येवला तालुक्यातील पाटोदा येथे असलेल्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा जनतेला आठ दिवसांआड पाणी मिळाले मात्र आता महिन्यात एकदा पाणी मिळते आहे नांदगाव शहराला 41 दिवस झाले पाणी नाही याला विकास म्हणतात का..? असा सवाल उपस्थित केला व या नांदगावला भयमुक्त करण्यासाठी मी उमेदवारी करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले मनमाड नांदगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण कचरा आहे हा सर्व कचरा काढण्यासाठी मी 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त साफसफाई मोहीम सुरू केली होती या माध्यमातून मी काम सुरू केले आहे.आणि भविष्यात देखील मी काम करणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले. यावेळी मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक अमित बोरसे महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख यांच्यासह इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
भयमुक्त नांदगाव आणि भुजबळ ब्रँड हाच अजेंडा..!
मनमाड नांदगाव तालुक्यातील पुढारी व सर्वसामान्य जनतेला भयमुक्त जीवन जगावे याशिवाय खऱ्या लोकशाहीचा अर्थ समजावा यासाठी मी माझी अपक्ष उमेदवारी करत असुन भयमुक्त नांदगाव व भुजबळ ब्रँड हाच माझा अजेंडा असुन याच अजेंड्यावर मी निवडणूक लढवणार आहे.