नाशिक: प्रतिनिधी
शहराचे माजी महापौर दशरथ पाटील यांनीही नाशिक पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य पक्षात त्यांनी प्रवेश केला असून, नाशिक पश्चिम मधून ते निवडणूक आखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे नाशिक पश्चिम मतदार संघातील लढत आता आणखी रंगतदार होणार आहे. भारतीय जनता पार्टीने आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या दिनकर पाटील यांनी काल राज ठाकरे यांच्या उपस्तिथीत मनसे मध्ये प्रवेश केला, त्यानंतर लगेच त्यांना नाशिक पश्चिम मधून उमेदवारी देखील जाहीर झाली, तर शिवसेनेने जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता दशरथ पाटील यांचीही उमेदवारी स्वराज्य पक्षाकडून जाहीर होणार आहे ,याशिवाय माजी आमदार नितीन भोसले यांनीही शरद पवार गटाकडून रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला होता मात्र ही जागा सेनेला सुटल्याने ते आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.