आजची युवा पिढी माझे जीवन, माझे नियम या तत्त्वावर चालली असून, फॅशनच्या नावाखाली अर्धवट कपडे आणि पाश्चात्य संस्कृतीच्या व्यसनामुळे तात्पुरते सुख शोधतेय. संविधानाने समानतेचा अधिकार दिला, पण ही स्वातंत्र्य मर्यादाहीन होऊन लग्न, एकत्र कुटुंब आणि पारंपरिक मूल्ये लुप्त ठरवतेय. लहान मुलं पालकांच्या मर्जीनुसार कपडे घालतात आणि संस्कार घेतात, पण युवक फॅशन ट्रेंड्स, सोशल मीडिया रील्सच्या प्रभावाने अर्धनग्न परिधान करतात. हे आकर्षण व्यसनात बदलते, ज्यामुळे शारीरिक संबंध सामान्य होतात आणि नैतिक पतन होते.
माझे जीवन माझे नियम हे तत्त्व स्वातंत्र्य दिसते, पण ते जबाबदारीशिवाय राहिले की पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण वाढते आणि दिशाहीन जीवनाला चालना मिळते. सोशल मीडियावर व्ह्यूजसाठी अश्लील कंटेंट बनवणारी तरुणाई व्यसनाधीन होते, ज्यामुळे यौन रोग, नैराश्य आणि गुन्हे वाढतात. एकत्र कुटुंब पद्धत तुटते, कारण लग्नाऐवजी लिव्ह-इन किंवा एकटेपणा पसंत होतो.
संविधानिक समानता महिलांना अधिकार देते, पण आजची पिढी ती विकृत फॅशन आणि तात्पुरत्या संबंधांसाठी वापरते, ज्यामुळे कुटुंबव्यवस्था, पालक-मुलांचा जिव्हाळा नष्ट होतो. एकत्र कुटुंबातील संवाद, आदर आणि जबाबदारी लुप्त होत असून, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली विवाह टाळले जातात. यामुळे भावनिक शून्यता, तात्पुरते नाते आणि भविष्यातील अस्थिरता वाढते. महाराष्ट्रासारख्या संस्कृतिप्रधान राज्यातही मंदिर ड्रेस कोड वाद आणि सोशल मीडिया अश्लीलतेमुळे पारंपरिक मूल्ये धोक्यात आली आहेत. संविधानाने अनुच्छेद 14 ने समानता आणि अनुच्छेद 21 ने जीवनाचा अधिकार दिला,पण ते वयानुसार मर्यादित असतात आणि समाजाच्या हितासाठी बंधने आहेत.संविधानिक समानता कायद्यासमोर सर्वांना आहे, पण वयाचा विचार न करता असा नियम नाही. उलट 18 वर्षांखालील मुलांसाठी पालकांचे संरक्षकत्व कायदेशीर आहे (गार्डियन्स अँड वॉर्ड्स अॅक्ट 1890).
युवा पिढीला माझे नियम चा अधिकार आहे, पण तो इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही. जसे- खझउ कलम 292 अंतर्गत अश्लील कृत्य किंवा झजउडज अंतर्गत मुलांवर प्रभाव टाकणारे कायदे लागू होतात.
पालकांना मुलांची अभिरक्षा आणि मार्गदर्शनाचा अधिकार आहे, कारण मुलांचे कल्याण हे सर्वोच्च आहे, जरी संविधान समानता देत असले तरी.संविधानाने जीवनाचा अधिकार दिला पण तो योग्य जीवन आहे, ज्यात मर्यादा आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने कलम 14 ला मनमानी कायद्यांना आव्हान देण्यासाठी वापरले आहे. सोशल मीडियावर व्ह्यूजसाठी युवक अश्लील रील्स, डान्स आणि कपल कंटेंट बनवतात, ज्यामुळे शारीरिक संबंधांचे व्यसन वाढते. केजीएमयू अभ्यासानुसार, 90% यौन रोगी सोशल मीडिया अति वापरकर्ते आहेत, ज्यांना वास्तविक संबंधांमध्ये रस राहत नाही.
फॅशन ट्रेंड्स जसे बिकिनी किंवा छोटे कपडे बॉलीवूडप्रमाणे प्रोत्साहित होतात, ज्यामुळे किशोर अश्लीलतेची नकल करतात आणि हिंसा वाढते. फॅशनच्या नावाखाली वाढती अश्लीलता युवा पिढीला व्यसन आणि गुन्हेगारीकडे नेत आहे, ज्यात सोशल मीडिया रील्स आणि बॉलीवूड कंटेंट मुख्य भूमिका बजावतात. हे फक्त कपडे नाहीत, तर विकृत संस्कृतीमुळे नैतिक पतन होत आहे. पालकांनी याचा विचार करावा.
ओटीटी आणि इन्स्टाग्रामवर अंतरंग दृश्य सामान्य झाले, ज्यामुळे युवक भटकतात आणि गुन्हे करतात. युवा पिढीला व्यसन किंवा गुन्ह्यांकडे जाण्यापासून पालकांचे हस्तक्षेप आवश्यक आहे, अन्यथा समाज विघटित होईल. कायदे व्यक्तिस्वातंत्र्याला संरक्षण देतात, पण बालकांच्या हिताला प्राधान्य देतात. माझे नियमचा अर्थ जबाबदारी घेणे, पालक आणि कायदे हे मार्गदर्शक आहेत, न की अडथळे. संविधानाची समानता समाजहितासाठी आहे, वैयक्तिक अराजकतेसाठी नाही. युवकांनी स्वातंत्र्य सोबत संस्कार जोडा जेणेकरून खरे जीवन मिळेल.सरकारने सोशल मीडिया कायदे कडक करावेत, तर समाजाने पाश्चात्य अंधानुकरण नव्हे तर भारतीय संस्कृतीचे रक्षण करावे. युवा पिढीला खर्या स्वातंत्र्याची जबाबदारीपूर्ण जीवनाची जाणीव करा. महाराष्ट्र ही संस्कृतीने नटलेली भूमी असून, येथे विदेशी किंवा इतर संस्कृतींचे अंधानुकरण न करता स्वतःची परंपरा जपणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक घरातून हे संकल्प बांधणे गरजेचे आहे, पण पालक आधुनिक विचारांच्या नावाखाली युवकांना प्रोत्साहन देत असल्याने भरकटण्याचे प्रमाण वाढले आहे.
महाराष्ट्रासारख्या संस्कृतिप्रधान राज्यातही मंदिर ड्रेस कोड वाद आणि सोशल मीडिया अश्लीलतेमुळे पारंपरिक मूल्ये धोक्यात आली आहेत. खझउ कलम 292, 294 अंतर्गत अश्लील कंटेंटवर कारवाई होते; केंद्राने 2025 मध्ये सोशल प्लॅटफॉर्म्सना 24 तासांत हटवण्याचे आदेश दिले.महाराष्ट्रात सार्वजनिक अश्लीलतेसाठी अटक होतात, पण कायदे कडक करण्याची गरज आहे.लहानपणात संस्कार दिले तर चांगले, पण आता पालकच ट्रेंड फॉलो करा म्हणतात, ज्यामुळे नैतिक मूल्ये नष्ट होतात आणि गुन्हे वाढतात. हे वास्तव आहे की, पालकांचे दुर्लक्ष किंवा प्रोत्साहनामुळे कुटुंबव्यवस्था तुटते आणि महाराष्ट्रातील युवा दिशाहीन होतात.महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी हा संकल्प बांधा- आपली संस्कृती जपूया, युवकांना खर्या मार्गावर आणूया.
My life my rules