मध्यस्थी – न्यायाचा शांततामय मार्ग

संवाद हा संघर्षावरचा सर्वार्ंत सुंदर विजय असतो असे म्हटले जाते. पण याला अपवाद नाही हेच खरे.. काही अनुभव असे असतात की ते फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवावेत असे वाटत नाही. अलीकडेच एका सेमिनारमधून मला मध्यस्थीविषयी अमूल्य ज्ञान मिळाले, आणि त्या ज्ञानाची ही छोटीशी वाटणी. कारण मिळालेलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवलं तरच त्याचं खरं मूल्य आणि सार्थकता वाढते.
वाद जिंकणं सोपं असतं, पण नातं वाचवणं कठीण असतं आणि हेच काम मध्यस्थी करते. आजच्या वेगवान आणि तणावग्रस्त जगात वाद, मतभेद आणि संघर्ष वाढत चालले आहेत. लहान कौटुंबिक भांडण असो, शेजार्‍यांमधील वाद असो किंवा आर्थिक व्यवहारांतील तक्रार प्रत्येक प्रश्न न्यायालयात नेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पण न्यायालयीन प्रक्रिया वेळखाऊ, खर्चिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक असते. अशा वेळी मध्यस्थी ही पद्धत समाजाला शांततेचा आणि समजुतीचा मार्ग दाखवते.
मध्यस्थी म्हणजे वादातील दोन्ही पक्षांना एकत्र बसवून, तटस्थ व्यक्तीच्या मदतीने चर्चा घडवून आणणे आणि परस्परहमतीने तोडगा काढणे. येथे कोण जिंकले आणि कोण हरले यापेक्षा दोघेही समाधानी राहतील असा निर्णय महत्त्वाचा असतो. त्यामुळे संबंध तुटत नाहीत, उलट विश्वास वाढतो. न्यायालयातील प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी आणि लोकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी मध्यस्थी अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळ आणि पैशाची बचत. वर्षानुवर्षे चालणार्‍या खटल्यांऐवजी काही तास किंवा काही बैठकींमध्ये प्रश्न सुटतो. शिवाय, कोर्टातील ताणतणाव, भीती आणि औपचारिकता यांपासून लोक वाचतात. मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही मध्यस्थी अधिक सकारात्मक आहे, कारण ती संघर्षाऐवजी संवादाला प्रोत्साहन देतात.
समाजात शांतता टिकवण्यासाठी संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. मध्यस्थी ही केवळ न्यायव्यवस्थेची पद्धत नसून ती एक संस्कार आहे. मतभेद असले तरी संवादाने मार्ग काढण्याचा संस्कार. जर प्रत्येक व्यक्तीने वाद वाढवण्याऐवजी तो मिटवण्याचा विचार केला, तर समाज अधिक सुसंवादी आणि प्रगत बनेल. वाढती न्यायालयीन प्रकरणे आज न्यायालयांमध्ये लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत. न्याय मिळण्यास उशीर होतो, आणि उशिरा मिळालेला न्याय म्हणजे अन्याय अशी भावना निर्माण होते. मध्यस्थीमुळे ही प्रकरणे कमी होण्यास मदत होते. डिजिटल युगातील मध्यस्थी आता ऑनलाइन मध्यस्थी ही संकल्पना वाढत आहे. व्हिडिओ कॉलद्वारेही चर्चा होऊन वाद मिटू शकतात. त्यामुळे दूर असलेले पक्षसुद्धा सहज सहभागी होतात. कौटुंबिक वादांसाठी प्रभावी उपाय घटस्फोट, मालमत्ता, पालक-मुलं वाद यांसारख्या नाजूक प्रकरणांत मध्यस्थी नातेसंबंध वाचवते. कोर्ट निर्णय देतो, पण मध्यस्थी समजूत घालते. समाजात संवाद संस्कृतीची गरज आज सोशल मीडिया आणि ताणतणावामुळे लोक पटकन भांडतात, पण बोलून प्रश्न सोडवण्याची सवय कमी होत चालली आहे. संवाद जिंकतो, तेव्हा वाद हरलेला असतो.
मध्यस्थी लोकांना संवादाची संस्कृती शिकवते. आजच्या काळात न्यायालयांवरील वाढता ताण, प्रलंबित प्रकरणांची संख्या आणि लोकांच्या वाढत्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मध्यस्थीचे महत्त्व अधिक वाढले आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन मध्यस्थीची सुविधा उपलब्ध झाली असून दूरवर असलेले पक्षसुद्धा सहज संवाद साधू शकतात. विशेषतः कौटुंबिक वादांमध्ये ही पद्धत नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मध्यस्थी ही केवळ न्यायाची प्रक्रिया नसून समाजात संवाद, समजूतदारपणा आणि शांततेची संस्कृती निर्माण करणारे प्रभावी साधन आहे. आजच्या तणावपूर्ण जगात शांततेचा मार्ग शोधायचा असेल, तर तो संघर्षातून नव्हे तर संवादातूनच मिळेल. मध्यस्थी हा त्या संवादाचा पूल आहे, जो मनांना जोडतो आणि समाजाला सुसंवादी बनवतो. एक जबाबदार नागरिक आणि कायदा सहाय्य कार्यात सहभागी व्यक्ती म्हणून मला वाटते की, मध्यस्थीची जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे.
कारण न्याय केवळ कोर्टात नाही, तर समजुतीतही मिळू शकतो. मला ठामपणे वाटते की मध्यस्थीची जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण न्याय केवळ न्यायालयाच्या निकालात नसतो, तर तो परस्पर समजुतीत, संवादात आणि समाधानातही मिळतो. आणि हेच समाधान समाजाला शांततेकडे नेणारं खरं पाऊल ठरतं. आजच्या तणावपूर्ण जगात शांततेचा मार्ग शोधायचा असेल, तर तो संघर्षातून नव्हे, तर संवादातूनच मिळेल. मध्यस्थी हा त्या संवादाचा पूल आहे, जो मनांना जोडतो आणि समाजाला सुसंवादी बनवतो. प्रत्येकाला समस्या असतात. फरक फक्त एवढाच असतो की आपण त्यांना कसं सामोरं जातो. परिस्थिती काहीही असो, चेहर्‍यावर हसू ठेवणं, सकारात्मक विचार करणं आणि मानसिक संतुलन जपणं हीच खरी ताकद आहे. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. सेमिनारमधून मला आणखी एक महत्त्वाची जाणीव झाली ती म्हणजे आहार, विहार आणि सकारात्मकता यांचे आयुष्यातील स्थान. संतुलित आहार, नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार ही केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक स्थैर्यासाठीही अत्यंत आवश्यक घटक आहेत. मन शांत आणि संतुलित असेल तरच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.
सकारात्मक विचार हेच यशाचं खरं गुपित असतं, मन जिंकलं की जग जिंकणं सहज शक्य होतं. शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, न्याय फक्त निकालात नसतो, तो समाधानात असतो. आणि हे समाधान देणारा सर्वांत सुंदर, सुलभ आणि मानवी मार्ग म्हणजे मध्यस्थी. समाजात सौहार्द टिकवण्यासाठी ही पद्धत जितकी वाढेल, तितकी न्यायाची खरी भावना बळकट होईल.जीवनात समस्या टाळता येत नाहीत, पण त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. संघर्षाऐवजी संवाद निवडला, तर तणावाऐवजी समाधान मिळते. म्हणूनच सकारात्मक विचार, शांत मन आणि समजूतदारपणा हीच खरी ताकद आहे. जी व्यक्तीला आणि समाजाला दोघांनाही उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते. वादात अहंकार वाढतो, सत्य हरवतं संवादात समज वाढते, आणि नातं जिंकतं. अहंकाराने वाद जिंकता येतो, पण मनं हरतं. संवादाने मनं जिंकली की आयुष्य आनंदाने भरतं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *