खड्ड्यांमुळे नायगाव-सायखेडा मार्ग धोकादायक

कासारवाडीत 50 ते 60 ब्रास मुरूम काढल्याचा आरोप

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील कासारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट क्रमांक 22 मधून विनापरवाना मुरूम उपसा केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात 50 ते 60 ब्रास मुरूम काढण्यात आल्याचा दावा असताना महसूल विभागाच्या पंचनाम्यात केवळ 20 ब्रास उपसा नोंदविण्यात आला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते बबन जगताप यांनी केला आहे. अचूक मोजमाप करून पूर्ण दंड वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शनिवार-रविवारच्या सुट्टीचा गैरफायदा घेत शासकीय जमिनीतून मुरूम उपसा सुरू असल्याची तक्रार जगताप यांनी केली होती. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व संबंधितांची मिलीभगत आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी जगताप यांनी केली. उत्खनन केलेला मुरूम रॉयल्टी न भरता समाज मंदिराच्या बांधकामासाठी वापरल्याचे त्यांनी सांगितले. जागेवर दोन ते तीन ठिकाणी मोठे खड्डे असून, सुमारे 60 ब्रास मुरूम चोरीला गेला आहे.
मोजणी यंत्रणेमार्फत अचूक मोजमाप करून पूर्ण दंडात्मक वसुली करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बबनराव जगताप यांनी केली आहे.

Naigaon-Saikheda road dangerous due to potholes.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *