नामकोच्या महिला डॉक्टरांनी
मागितली तीस हजारांची लाच
लाचलुचपतच्या पथकाकडून गुन्हा दाखल
नाशिक: प्रतिनिधी
शस्रक्रिया झालेली असतानाही महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून रुग्णाकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यामोबदलात एकदा 9 हजार व दुसऱ्यांदा 11 हजार स्वीकारणाऱ्या नामको कॅन्सर रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विशाखा जहागीरदार, कॅशियर महिला कर्मचारी व गायत्री सोमवंशी अशा तिघीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार हे दारिद्र्य रेषेखालील असून, त्यांच्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे. तक्रारदार यांची पत्नी या रुग्णालयात दाखल होत्या, महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी नामको च्या डॉक्टरानी दिनांक 3 एप्रिल रोजी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 9 हजार स्वीकारले. तर 7 एप्रिल रोजी 21 हजारांची मागणी करून त्यापैकी11 हजार रुपये स्वीकारले म्हणून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेमबाडे, युवराज खांडवी, राजश्री अहिरराव, परशराम जाधव यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…
श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…
लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…
परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…