नाशिक

गोवंश वाहतूक करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या

पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त, नाशिकरोडला कारवाई

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात बेकायदेशीर गोवंश वाहतुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेंंतर्गत 15 गायी, आठ बैलांची सुटका करत सहा पिकअप जप्त करण्यात आले. सुमारे 15 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या 22 मेपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव टोलनाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती. गुप्त माहिती व नागरिकांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर पशू वाहतूक करणार्‍या आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता व पशुधन संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात आढळलेले प्रमुख दोष म्हणजे पशुधन वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या अधिकृत परवानग्यांचा अभाव, तसेच गायी-बैलांची अयोग्य व अमानुष पद्धतीने वाहतूक. जप्त करण्यात आलेले पशुधन सुरक्षित गोशाळेत हलविण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राहुल काकडे, गणेश हिरे, अविनाश देवरे, विजय टेमगर, विष्णू गोसावी, अनिल पवार, नंदकुमार भोळे, अरुण गाडेकर, अनिल मोरे, अरुण हाडस, प्रवीण बोडके, बाळकृष्ण सोनवणे, सचिन सगळे, अंबादास केदारे, नितीन भामरे, नाना पानसरे, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, संतोष पिंगळ, लक्ष्मण पानसरे व योगेश रानडे यांनी कामगिरी बजावली.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago