लासलगाव प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील उगाव रेल्वे स्थानकाजवळ नाशिक येथून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या एका डब्याच्या चाकातून धूर निघाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली या घटनेमुळे प्रवाशी वर्गात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक कडून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या नांदेड लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या एका डब्याच्या खालच्या भागातून सकाळी १० वाजेच्या सुमारास धूर निघाल्याने प्रवाशी वर्गात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता या घटनेनंतर
उगाव रेल्वे स्थानकावर सदर गाडी थांबविण्यात आली.
या वेळी एक्सप्रेसच्या चालकाने खाली उतरून बघितले असता चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आले.त्यावेळी तात्काळ अग्निप्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित करून अग्निरोधक पावडर सोडून धूर आटोक्यात आणण्यात आला त्यानंतर ब्रेक दुरुस्त करून एक्सप्रेस मनमाडच्या दिशेने रवाना करण्यात आली.