नांदगाव बाजार समितीची मतमोजणी सुरू, आ. कांदे यांना इतक्या जागा

नांदगाव: प्रतिनिधी

नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी पूर्ण  झाली असुन आतापर्यत जाहीर झालेल्या निकालपैकी  शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलला 14   जागा, एक जागा अपक्ष व दोन जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्या आहेत यामध्ये हमाल मापारी गटातील अपक्ष उमेदवार निलेश इप्पर हे विजयी झाले असुन ग्रामपंचायत गटातुन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अमित बोरसे हे निवडून आले तर सोसायटी गटातून दर्शन आहेर हे निवडून आले आहेत.सुहास कांदे यांच्या पॅनलचे अनिल सोनवणे दीपक मोरे बंडू पाटील अनिल वाघ हे निवडून आले तर व्यापारी गटातील यज्ञेश कलंत्री  विजयी झाले असून  व्यापारी गटातील दुसऱ्या जागेसाठी अमोल नावदंर व गोकुळ कोठारी यांना समान मते पडल्याने  फेर मतमोजणी करण्यात येणार आहे,

2 thoughts on “नांदगाव बाजार समितीची मतमोजणी सुरू, आ. कांदे यांना इतक्या जागा

  1. चांगल्या कामाची पावती ही मिळतच असते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *