बेकायदेशीर नावे कमी केल्याशिवाय माघार नाही
वाढोली येथील भावसार यांचे उपोषण सुरूच
नाशिक : प्रतिनिधी
त्रंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील नवनाथ मंदिराच्या मिळकतीवर बेकायदेशीर पणे लावण्यात आलेली 11 नावे तातडीने काढून टाकण्यासाठी येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे, नावे रद्द होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषण कर्ते नीलेश भावसार यांनी सांगितले,
दरम्यान, ही बेकायदेशीर नावे कमी करण्यात यावी तसेच हे प्रकरण जरी दिवाणी न्यायालयात सुरू असले तरी न्यायालयाने कुठेही स्थगिती आदेश दिलेला नाही, त्यामुळे उपोषण कर्ते भावसार यांच्या अर्जावर तातडीने अंमलबजावणी करावी, असे पत्र पंचायत समिती चे गटविकास अधिकारी खातळे यांनी वाढोली ग्रामपंचायत यांना दिले आहे, ग्रामपंचायत ने उद्या 2 मे रोजी यावर सभा बोलावली आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश देऊनही अंमलबजावणी केली नाही म्हणून ग्रामसेवक वर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भावसार यांनी केली आहे,
आधी अंमलबजावणी करावी, दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवकवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे भावसार यांनी सांगितले,
पंचायत समितीच्या वतीने दिलेलं पत्र