न्यायडोंगरी येथे अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या
नांदगाव तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच
मनमाड: प्रतिनिधी
– नांदगाव तालुक्यातील खुनाचे सत्र थांबता थांबेना मागील काही दिवसांपूर्वी मुलाच्या मदतीने पत्नीने दारुड्या पतीला संपवले डॉक्टर पतीने वडिलांच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवले या घटना ताज्या असतानाच आज न्यायडोंगरी येथे अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली आहे.न्याडोंगरी बोलठाण रोडवर गट नंबर 847/3 या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे दगडाने ठेचून हा खून करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असुन माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला मयताची ओळख पटवून या व्यक्तीचा खून कोणी केला व का केला याचा तपास करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.
पोलीस करतात तरी काय?
– तालुक्यातील खुनाचे सत्र सुरू असल्याने पोलिसांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असुन अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…