पुण्यातून फरार झालेल्या ललितचा नाशिकमध्ये होता मुक्काम ?

पुण्यातून फरार झालेल्या ललितचा नाशिकमध्ये होता मुक्काम ?

– ड्रग्ज तस्कर ललित पाटील करणार गौप्यस्फोट

नाशिक – विशेष प्रतिनिधी
ड्रग्ज तस्कर ललित पाटील चेन्नईमध्ये पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. पुण्यातून पळालेल्या ललित पाटीलने नाशिकमध्ये काही दिवस मुक्काम ठोकल्यानंतर व्हाया गुजरात दक्षिणेकडे गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ललितला नाशिकमध्ये कोणी आश्रय दिला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
‘एमडी’ या अती घातक व महागड्या ड्रग्जचे उत्पादन करून राज्यात विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील १५ दिवसांनी बुधवारी चेन्नईत मुंबई पोलिसांच्या हाती लागला. तिथे पोलीस पथक त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडील कँमेऱ्यांनी ललित पाटील याने दिलेला गर्भित इशारा टिपला आहे. “मी ससून मधून पळून गेलेलो नाही. मला पळवण्यात आले. कोणाकोणाचा हात आहे, मी सर्व सांगणार आहे. पत्रकारांशी बोलेन”, असा इशारा त्याने दिला आहे.
दरम्यान, पुण्यातून पळाल्यानंतर ललित पाटील नाशिकमध्ये आला होता. काही दिवस तो नाशिकमध्येच होता. तिथून तो गुजरात व त्यानंतर कर्नाटकमध्ये गेल्याचे पुढे येत आहे. नाशिकमध्ये ललित व भूषण या पाटील बंधूंच्या ड्रग्ज कारखान्याचा साकीनाका पोलिसांनी उलगडा केल्यानंतर आता ललितच्या वास्तव्याबाबतची माहिती पुढे येत असल्याने नाशिक पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकमध्ये तो कुठे लपला होता, त्याला कोणी मदत केली याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago