नांदुरी बसस्थानक वादाच्या भोवऱ्यात,जागा मालकाला ताण असह्य झाल्याने हृदयविकाराचा धक्का

नांदुरी बसस्थानक वादाच्या भोवऱ्यात

जागा मालकाला ताण असह्य झाल्याने हृदय विकाराचा धक्का

नाशिक : प्रतिनिधी

नांदुरी येथील आदिवासी शेतकरी कृष्णा गमजी राऊत यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एस टी महामंडळने लाखो रुपयांची  जागा हडप केल्याचा दावा  उत्तम कृष्ण राऊत यांनी केला आहे
एस टी महामंडळाला 1970 साली सप्तशृंगी गडावर यात्रा उत्सव कालावधीसाठी गट नंबर 352 व 354 शेत जमीन भाडेतत्त्वावर दिली होती. परंतु आमचे वडील कृष्णा गमजी राऊत यांचे निधन झाल्याने एसटी महामंडळने कुणाला माहीत न माहित वर्षानुवर्ष आस्थागायक त्या जागेचा उपयोग घेताना दिसून येत आहे
नांदुरी बस स्थानक संदर्भात 20/12/2016 पासून जिल्हा न्यायालय नाशिक येथे दावा दाखल असूनसुद्धा एसटी महामंडळने दडपशाही पद्धतीने तर सार्वजनिक बांधकाम विभागाने हुकूमशाही पद्धतीने बस स्थानकाचे काम सुरू ठेवले आहे.
मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला एसटी महामंडळाला वारंवार पत्रव्यवहार करून त्याच्या लक्षात आणून दिले आहे की ह्या नांदुरी बस स्थानकाची जागा न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी कोणतेही अनाधिकृत काम करु नये हे काम त्वरित थांबवावे अशी राऊत कुटुंबियांनी विनंती केली आहे
तरीसुध्दा एस टी महामंडळने व सार्वजनिक बांधकाम विभागाने यात कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही
उत्तम कृष्ण राऊत हे नांदुरी बस स्थानकाच्या जागेवर जाऊन अनाधिकृत काम थांबवण्यासाठी वारंवार सा.बा विभाग पदाधिकाऱ्यांना व ठेकेदाराला रडून आक्रोशाने सांगत असताना त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली व ते जागीच खाली पडले त्यांना त्वरित नांदुरी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले परंतु त्यांची परिस्थिती पाहता त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना खाजगी वाहनाने त्वरित जिल्हा रुग्णालय नाशिक येथे हलवण्यात आले व जिल्हा रुग्णालय संदर्भ हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्यावर विविध चाचण्या केल्या असता त्यांना ह्या वरील सर्व गोष्टींच्या तणावामुळे उत्तम कृष्णा राऊत यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आज संदर्भ हॉस्पिटल  येथे हृदयविकाराची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
आमचा न्याय देवतेवर पूर्णपणे विश्वास आहे न्याय देवता जो निकाल दिईल तो आम्हास मान्य राहील. तत्पूर्वी त्या ठिकाणी कुणीही अनधिकृत बांधकाम करू नये ही आमची राऊत कुटुंबीयांची सर्व विभागाला कळकळीची विनंती केली आहे

प्रतिक्रिया
नांदुरी बस स्थानक संदर्भात नाशिक न्यायालय येथे खटला चालू असूनसुध्दा एसटी महामंडळ कळवण व सार्वजनिक बांधकाम विभाग हे कुणाच्या आशीर्वादाने काम करत आहे याची सखोल चौकशी व्हावी तसेच माझे वडील जिल्हा रुग्णालय येथे हृदयविकाराच्या झटक्याने ऍडमिट असल्याने त्यांच्या जीवितास काय कमीजास्त झाल्यास पूर्णतः एस टी महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील…
गुलाब उत्तम राऊत

पीडित जागा मालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *