नांदूरनाका येथे गुटखा पकडला

 

नाशिक : विशेष प्रतिनिधी

मानवी सेवनास अपायकारक असलेल्या गुटख्याविरुद्ध सातत्याने कारवाई होत असतानाही छुप्या मार्गाने प्रतिबंधित पानमसाला शहरात आणला जात आहे. हॉटेल जत्रा ते नांदूर नाका लिंकरोडवर अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने केलेल्या कारवाईत छोट्या टेम्पोसह गुटखा असा सव्वाचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल

जप्त केला.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, आडगाव शिवारातील जत्रा हॉटेल ते नांदुर नाका रोडवरील कुंदन हॉटेल समोर येथे वैभव दिलीप भडांगे (वय 24 वर्षे, रा. वडजाई) यास पांढरे रंगाची छोटा टेम्पोसह अडवण्यात आले.

टेम्पोत मानवी सेवनास अपायकारक असणारा पानमसाला विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना आढळून आला. हा साठा त्याने अब्दुल रहमान उर्फ राहिल मेहमुद फारूकी (वय 34 वर्षे, रा. मोतीसुपर मार्केट, फ्लॅट नं. 106, भक्तीधाम मंदिरासमोर, पेठ रोड, पंचवटी) याच्याकडून घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे, निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार संजय ताजणे, देवकिसन गायकर तसेच नितीन भालेराव, रवींद्र दिघे, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, महिला शिपाई भड यांनी ही कामगिरी

केलेली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *