दहावीचा नाशिक विभागाचा निकाल 95.90टक्के

नाशिक :प्रतिनिधी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला नाशिक विभागाचा निकाल 95 .90 टक्के लागला.या परीक्षेसाठी  नाशिक विभागातून  एकूण या परीक्षेसाठी एकूण एक लाख आठ हजार 829 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख 96 हजार 714 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी एक लाख 88 हजार 666 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल  96.94 टक्के लागला आहे.कोकणाचा  निकाल सर्वात् जास्त तर  सर्वात् कमी निकाल  नाशिक विभागाचा लागला आहे.विद्यार्थ्यांना त्यांच्या निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

दहावीतही मुलीच हुशार
निकालामध्ये बारावीनंतर कोकण विभागाने बाजी मारली असून दहावीतही नाशिक विभागाने मार खाल्ला आहे. नाशिक विभाग 95.90 टक्क्यांसह राज्यात तळाशी आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

 

दहावीचा नवीन निकाल येथे पाहता येणार

 

WWW.maharesult.nic.in

 

http://sscresult.mkcl.org

 

https://ssc.maharesults.org.in

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *