नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये आज मध्यरात्रीपासून 12 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा, सभा, निदर्शने करता येणार नाही. ज्ञानवापी मजीद वाद, भोंगा आंदोलन या संदर्भात आंदोलन किंवा मोर्चा निघण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाशिक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या काळात शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.