नाशिक कृउबा निवडणूक : ठाकरे गट स्वबळावर लढवणार



इच्छुक उमेदवारांची जाणून घेतली मते


नाशिक : प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक शालिमार कार्यालयात पार पडली.
ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले. यावेळी उपनेते सुनिल बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदींनी यावेळी इच्छुकांची मते जाणून घेतली.

माजी आमदार वसंत गिते,माजी महापौर विनायक पांडे,माजी म.न.पा.गटनेते विलास शिंदे, उप जिल्हाप्रमुख महेश बडवे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,माजी नगरसेवक डी.जी. सुर्यवंशी,गोकूळ पिगंळे यांच्यासह इच्छुक उमेदवार भारती ताजनपुरे,सविता तुगांर,जगन आगळे,प्रकाश म्हस्के,भास्कर गावित, उत्तम खांडबाहाले,उत्तम आहेर,नवनाथ गायधनी, गोकूळ काकड,संजय तुगांर,सुरेश निमसे,दिनकर पाळदे,भरत आहेर,आशोक ( बालम ) बोराडे यांसह शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ही निवडणूक स्वबळावर लढवून ती जिंकण्याची आमची सक्षम यंत्रणा तयार आहे. निवडणूक स्वातंत्रपणे लढवाव्यात अशी इच्छुक उमेदवारांचे म्हणने असून त्यांचा आम्ही आदर बाळगतो.काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अन्य मित्र पक्षही शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांच्याशी युती करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय श्रेष्ठी घेतील आणि माघारीच्या अंतिम तारखेच्या आधी याबातचा फैसला निश्चितच होईल,असे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख प्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले. आम्ही सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार असल्याचे उपनेते सुनील बागूल म्हणाले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर,माजी आमदार वसंत गिते यांनीही मनोगत व्यक्त केले.

Ashvini Pande

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

6 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

7 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

7 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

10 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

10 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

10 hours ago