नाशिक : प्रतिनिधी
पळसे, मिरची चौक येथील बसला आग लागण्याच्या घटना ताज्या असतानाच आज दुपारी पेठहून नाशिकला येणार्या बसमधून अचानक धूर निघू लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला कळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
पेठहून येणारी एमएच 14 बी.टी 3338 ही बस आरटीओ कार्यालयाजवळ फुलेनगर थांब्याजवळ येताच इंजिनमधून धूर निघू लागला. त्यामुळे प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करत प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. अग्निशामक दलाला कळविल्यानंतर बंब तातडीने दाखल होऊन आग भडकण्यापूर्वीच विझविण्यात यश मिळाले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरची चौक आणि पळसे गावाजवळ बसला आग लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच ही मोठी दुर्घटना घडता घडता वाचली. बसला वारंवार लागणार्या आगींमुळे महामंडळाच्या बसच्या दुरुस्ती आणि मेंटेनन्सबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसमधून धूर निघू लागताच प्रवाशांनी आरडा ओरड केला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…