नाशिक

‘अवादा भारत उदय यात्रे’ला नाशिककरांना प्रतिसाद

अक्षय ऊर्जेचा संदेश देत जनजागृती

नाशिक : प्रतिनिधी
देशभरात अक्षय ऊर्जा आणि शाश्वत जीवनशैलीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेली अवादा ग्रुपची ’अवादा भारत उदय यात्रा’ आता नाशिक शहरात दाखल झाली आहे. 8 मे रोजी नोएडामधून रवाना झालेल्या या विशेष यात्रेने उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात असा प्रवास करत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. आतापर्यंत सुमारे 1,714 किमीचा टप्पा पार करून ही यात्रा नाशिककरांच्या भेटीस आली आहे. शहरात या मोहिमेच उत्साहात व उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात
आले.
या मोहिमेच्या महत्त्वाविषयी अवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल म्हणाले, की जागतिक स्तरावरील भू-राजकीय अनिश्चितता आणि जीवाश्म इंधनपुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे निर्माण झालेली आव्हाने पाहता, भारताचे अक्षय ऊर्जेकडे होणारे संक्रमण ही केवळ काळाची गरज नसून देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. ‘अवादा भारत उदय यात्रे’च्या माध्यमातून अक्षय ऊर्जा अधिक सुलभ आणि सर्वसामान्यांच्या प्रत्यक्ष कृतीत आणण्याजोगी बनवण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून ही जनजागृती एका देशव्यापी चळवळीत रूपांतरित होईल. 17.7 पेक्षा जास्त अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओ असलेल्या अवादा ग्रुपने या यात्रेच्या माध्यमातून नाशिकमधील स्थानिक नागरिक, तरुण आणि विविध सामाजिक घटकांशी पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत थेट संवाद साधला.
शहरात आयोजित करण्यात आलेल्या पथनाट्यांनी आणि संवादात्मक सत्रांनी नाशिककरांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सौर आणि पवन ऊर्जेबाबतचे सर्वसामान्य गैरसमज दूर करण्यासाठी ही सत्रे अत्यंत उपयुक्त ठरली. यासोबतच नागरिकांनी शाश्वत भविष्यासाठी वैयक्तिक पातळीवर योगदान देण्याची शपथ घेत ’डिजिटल ग्रीन प्लेज’ (हरित प्रतिज्ञा)देखील मोठ्या संख्येने नोंदवली.
नाशिकमधील विद्यार्थ्यांचा आणि स्थानिक संस्थांचा या यात्रेला मिळालेला प्रतिसाद अतिशय सकारात्मक होता. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेचा दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल, याबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसली. आगामी काळात ही यात्रा महाराष्ट्रातील इतर भागांत आणि देशातील इतर राज्यांमध्ये आपला प्रवास सुरू ठेवणार असून, शाश्वश्वतेचा हा संदेश घराघरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अवादा ग्रुपने केला आहे.

Nashik residents respond to ‘Awada Bharat Uday Yatra’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago