नाशिक

नाशिकरोडला सकाळी तुरळक तर सायंकाळी गर्दीचा महापूर

भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, पोलिसांची धावपळ; काही मतदान केंद्रांत अंधारामुळे गोंधळ

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत नाशिकरोडच्या सर्वच प्रभागांमध्ये भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली. त्यातच अपक्ष उमेदवारांची संख्या यंदा जास्त आहे. त्यामुळे मतदानावेळी तीव्र चुरस पाहायला मिळाली. सकाळी मतदानाला गर्दी कमी होती. मात्र, सायंकाळी गर्दीचा महापूर आल्याचे सर्वच केंद्रांवर दिसून आले.
15 दिवसांपासून सुरू असलेल्या महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संपल्यानंतर बुधवारीदेखील उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू होत्या, तर बुधवारी वैर्‍याची रात्र असल्याने उमेदवार आणि त्यांचे समर्थक कोणी पैसे वाटतात का, याची देखरेख करीत होते. गुरुवारी सकाळी प्रत्येक प्रभागात मतदानाला सुरुवात झाली. प्रभाग 21 मध्ये भाजपच्या एका उमेदवाराच्या घरावर हल्ला केला.
नाशिकरोडच्या सहा प्रभागांतील विविध राजकीय पक्ष व अपक्ष असे सुमारे 150 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी परिसरातील सर्व मतदान केंद्रांवर उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. अनेक उमेदवारांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनीसुद्धा आपले मतदान केले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. जेलरोड येथील दसक-पंचक, कोठारी कन्या शाळा, सिन्नर फाटा, विहितगाव, देवळाली गावातील आठवडे बाजार मनपा शाळा, आर्टिलरी सेंटर रोडवरील आनंदऋषी शाळा या मतदान केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. सर्वच उमेदवार आपल्याला मतदान करा, असे आवाहन मतदारांना करीत होते. त्याचप्रमाणे मतदारांना मतदान करण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांचा वापर केला असल्याने केंद्राबाहेर खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मतदान केंद्रावर अचानक गर्दी झाल्याने लक्ष्मीदर्शन झाले की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत होती. मतदानाचा वेळ साडेपाच वाजेपर्यंत होता. मात्र, जे मतदार केंद्रात होते, त्यांना मतदान करून दिले जात होते, परंतु काही ठिकाणी अंधार असल्याने गोंधळ उडाला होता.

भाजप उमेदवार खोले यांच्या घरावर हल्ला

प्रभाग 21 मधील भाजपचे उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर काही विरोधकांनी हल्ला केला. हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला.

उमेदवार व्हीलचेअरवर

भाजपचे उमेदवार प्रा. शरद मोरे हे जेलरोडचे प्रभाग 18 मधून उमेदवारी करत आहेत. नुकतीच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली. असे असतानाही ते पंचक येथील मतदान केंद्राबाहेर उमेदवारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी व्हीलचेअरवर उपस्थित होते. नाशिकरोडला सर्वांत जास्त 21 बूथ आणि मतदारसंख्या येथे असल्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार येथे तळ ठोकून होते. प्रा. शरद मोरे हे कुटुंबीयांसमेवत आले होते.

आढावांच्या गाडीत रोकड

जेलरोड येथे नारायणबापू चौकाजवळ अभिनव आदर्श हायस्कूल येथे सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होती. या शाळेजवळच इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीजवळ माजी नगरसेवक दिनकर आढाव यांची चारचाकी गाडी उभी होती. त्या गाडीतून मतदारांना पैसे दिले जात असल्याचा दावा तेथे उभ्या असलेल्या शिंदे सेना आणि उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांना केला. यामुळे तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलीस व निवडणूक शाखेचे भरारी पथक तेथे दाखल झाले. कार्यकर्त्यांनी गाडीची तपासणी करण्याची मागणी केल्यावर भरारी पथकाने तपासणी केली असता, गाडीच्या पुढील भागात पाचशेच्या नोटांचे बंडल मिळून आले. पोलिस व भरारी पथकाने आढाव यांची गाडी व गाडीतील रोकड ताब्यात घेत उपनगर पोलिस ठाण्यात नेली. उपनगर पोलिस ठाण्यात अजून गुन्हा दाखल झालेला नाही. जेलरोड येथे प्रभाग 17 मधील भाजपचे उमेदवार दिनकर आढाव यांच्या गाडीमधून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. भरारी पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत ही गाडी ताब्यात घेतली. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, या प्रकरणी दिनकर आढाव यांनी सांगितले की, हे पैसे व गाडी माझीच आहे. मात्र, हे पैसे माझ्या सोयाबीन विक्रीचे आहेत.

Nashik Road sees heavy traffic in the morning and heavy traffic in the evening

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago