नाशिक

पंचवटी विभागात सर्वत्र मतदान शांततेत

सर्वच उमेदवारांची धडधड वाढली

पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटी विभागातील एक ते सहा प्रभागांमधील म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद व नांदूर येथील मतदान केंद्र वगळता इतर मतदान केंद्रांवर मतदारांची फारशी गर्दी दिसली नाही. या निवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. आपापल्या वाहनातून, काहींना रिक्षातून आणणे आणि पुन्हा सोडण्यात येत होते. दुपारनंतर मतदान केंद्रावरील गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, तितकी गर्दी वाढली नाही.
विशेष म्हणजे, फुलेनगर मनपा शाळा क्रमांक 9 परिसरात सायंकाळी 5.30 वाजेनंतर यापूर्वीच्या सर्वच निवडणुकांच्या वेळी मतदारांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असायच्या, परंतु यावेळी मात्र या भागात पूर्णतः शुकशुकाट दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर मतदान झाल्याने आता उमेदवारांची मात्र चांगलीच धडधड वाढली आहे. पंचवटीतील सर्वच प्रभागांमधील प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार व त्यांचे समर्थक उभे राहून मतदारांना हात जोडून आवाहन करीत होते. आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी सर्वच प्रभागांत मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. चुरशीच्या लढती असलेल्या केंद्रांवर उमेदवार ठिय्या देऊन उभे होते. एकाच वेळी चार मतदान करावयाचे असल्याने वयोवृद्ध व्यक्तींना ईव्हीएमचे बटण दाबताना गोंधळ उडत होता. त्यामुळे मतदानास वेळ लागत होता.

प्रभाग सहामध्ये आमदार खोसकर यांची प्रतिष्ठा पणाला

प्रभाग क्रमांक सहामध्ये आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांची कन्या इंदुमती भोये (खोसकर) यांना उभे केल्याने त्यांनी तसेच मखमलाबादचे रहिवासी असलेल्या अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही गेल्या काही दिवसांपासून या प्रभागात तळ ठोकला होता. तर आपल्या मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा त्यांनी आपल्या लेकीसाठी कामाला लावल्याचे दिसून आले. त्यांच्या कन्येसाठी त्यांनी या प्रभागात आपल्या मतदारसंघातील कोण कोणाचे नातेवाईक आहेत, याचा शोध लावत त्या नातेवाइकांना प्रभागातील मतदारांशी संपर्क करायला सांगून आपल्या लेकीला मतदान करा, असे सांगितले.

फुलेनगरात पहिल्यांदाच शांतता

प्रभाग क्रमांक चारमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या फुलेनगर परिसरात मात्र यावेळी सायंकाळी साडेपाच वाजेनंतर मनपा शाळा क्रमांक 9 च्या बाहेर पहिल्यांदाच शांतता दिसून आल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींसह पोलिसांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.

Voting peaceful throughout Panchavati division

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

21 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

21 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

21 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

21 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

22 hours ago