नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, पंचवटीत भाजीपाला घेण्यास गेलेल्या तरुणाची किरकोळ वादातून हत्या

वडिलांसोबत भाजीपाला घेण्यास गेला अन जीव गमावला

सिडको:  विशेष प्रतिनिधी

गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या वडिलांसोबत बुधवारच्या बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवकासोबत किरकोळ पैशांच्या वादात एका अल्पवयीन मुलाने धारदार हत्याराने वार करुन खुन केल्याची घटना पंचवटी परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळ घडली आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.
याबाबत पंचवटी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नंदलाल उर्फ सुरज जगतकुमार दास परदेशी (वय १९ रा. सीतागुंफा रोड पंचवटी) हा बुधवारचा आठवडे बाजारात आपल्या वडीलांसोबत भाजीपाला घेण्यासाठी गाडगे महाराज पुलासमोरुन सायंकाळच्या सुमारास जात असतांना एका अज्ञात व्यक्तीसोबत किरकोळ पैशांवरून वाद झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने आपल्याजवळी धारदार हत्याराने वार करून तेथुन पसार झाला या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करण्यात आला दरम्यान येणाऱ्या जाणा-या लोकांनी जखमी नंदलाल ला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अतिरक्तश्राव झाल्याने उपचारा दरम्यान त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस करीत आहे.

नागरिक भयभीत

शहरातील दिवसेंदिवस खुनाच्या घटनेत होणारी वाढ तसेच वाढती गुन्हेगारी यामुळे नागरिक पुरते भयभीत झाले असुन मंत्र भुमी ते यंत्र भुमी अशी ओळख असलेल्या नाशिकची ती ओळख पुसुन आता गुन्हेगारांची भुमी अशी होऊ पहात आहे. भविष्यातील हा संभाव्य धोका ओळखून पोलिस प्रशासनाने वेळीच गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा बिमोड करण्याची मागणी नाशिककर नागरिकांनी केली आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

2 days ago

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…

2 days ago

दहापट पैसे कमवायला गेली…खेळण्याचे पैसे घरी घेऊन आली

शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…

3 days ago

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला

फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला   शहापूर :  साजिद शेख एका…

4 days ago

आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…

4 days ago

उज्ज्वल निकम होणार खासदार

उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…

4 days ago