नाशिक

नाशिक जिल्हा परिषद कार्यतत्पर : राजोळे

विधान मंडळ समितीकडून कामकाजाचे कौतुक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न, बालमृत्यू नियंत्रण, अंगणवाडी विकास, पंचायत समिती, अंगणवाडी, प्राथमिक शाळांचे कामकाज, कुपोषणाबाबत भविष्यातील योजना, विशाखा समितीचे कामकाज याबाबत नाशिक जिल्हा परिषद कार्यतत्पर असून, कामकाज समाधानकारक असून, जिल्हा परिषद अधिक कार्यक्षमतेने कामकाज करेल, असे प्रतिपादन विधान मंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षा मोनिका राजोळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीचा गत तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्याबाबत तीन दिवसीय दौरा सुरू होता. शुक्रवारी (दि.15) समितीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक घेत जिल्ह्यातील विकासकामांचा तसेच महिलांचे प्रश्न, बालमृत्यू, अंगणवाडी आदींचा आढावा घेतला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मोनिका राजोळे म्हणाल्या की, तीन दिवसांत जिल्ह्यातील निरीक्षण गृह, पंचायत समिती, पोलीस स्टेशन्स, अंगणवाडी यांना समितीने भेटी दिल्या. यावेळी विशाखा सेल्स, भरोसा सेल्स, पेट्रोलिंग टीमच्या कामकाजाचीही पाहणी करण्यात आली. सध्याच्या स्थितीत महिलांवरील अन्याय, अत्याचार बघता पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील महिलांचे मृत्यू, गरोदर मातांचे प्रश्न, बालमृत्यू, पोषण आहार रोखण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते. त्यादृष्टीने भविष्यातील परिणाम हे सकारात्मक असायला हवे. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही याबाबत काळजी घ्यावी. नाशिक जिल्ह्यात आदिवासी तालुके असल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनीही लेखी मागण्या मांडल्या आहेत. स्मार्ट अंगणवाडी, शाळांची दुरुस्ती, डिजिटल क्लासरूम याबाबत सूचना केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

टीसीएस प्रकरणी कडक भूमिका का नाही घेतली?
टीसीएस प्रकरणाबाबत राजोळे यांनी एमआयडीसीचे अधिकारी तसेच टीसीएसमधील अधिकारी काय करत होते, त्यांनी कडक भूमिका का घेतली नाही, असा सवाल उपस्थित केला.

जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या, शाळा दुरुस्त होणे गरजेचे आहे. क्लासरूम स्मार्ट आणि डिजिटल होणे गरजेचे आहे. याबाबत समितीला निवेदन देण्यात आले. समितीकडून संबंधित विभागांना याबाबत सुधारणा करण्यासाठी सूचना देण्यात
आल्या आहेत.
– सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

Nashik Zilla Parishad ready for action: Rajole

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago