नाशिक : प्रतिनिधी पुण्याचे प्रसिध्द चित्रकार सुबोध कार्लेकर यांच्या विविध माध्यमातील चित्रकृतींचे प्रदर्शन दि. 22 ते 24 एप्रिलदरम्यान कुसुमाग्रज स्मारक येथेे भरविण्यात येणार आहे.
सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालणार्या या प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी दहाला आंतरराष्ट्रीय ख्यातीेचे चित्रकार राजेश सावंत , प्रफुल्ल सावंत , एसएमआरकेे महविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे , गायक पं. अविराज तायडेे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.प्रदर्शनात कार्लेकर यांंनी पेेन्सील, कोलाज, ऑईल कलर, बॉलेपनने साकारलेल्या विविध कलांचे दर्शन होणार आहे. त्यात व्यक्तीचित्र, निसर्गचित्र, वास्तुचि्त्रांचा समावेश आहे.रसिकांनी सकाळी दहा ते रात्री आठपर्यंंत याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्लेकर यांंनी केले आहे.